कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होत असून निकालानंतर विजयी उमेदवारांना गावोगावी मिरवणुका काढता येणार नाहीत. कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्यास त्याच ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी बुधवारी दिली. मतमोजणी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. प्रत्येक व्यक्तीची हालचाल कॅमेराबद्ध असल्याचे तांबडे म्हणाले. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात उमेदवारांच्या मिरवणुकांवर बंदी
By admin | Updated: February 23, 2017 04:02 IST