शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

विकासाभिमुख कागलच्या समस्याही बेसुमार--कागल तालुका

By admin | Updated: November 5, 2014 00:04 IST

तालुक्यातील महत्त्वाच्या समस्या

जहाँगीर शेख - कागल --तीन नद्यांचे वरदान लाभलेला कागल तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक जमीन सिंचनाखाली असलेला तालुका आहे. चार साखर कारखाने, दोन दूध संघ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध शैक्षणिक केंद्रे, दळणवळणाच्या सुविधा यांनी तालुका आज प्रगतिपथावर आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही तितक्याच गंभीर झाल्या आहेत.येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे येथे जसा रोजगार निर्माण झाला, तसा परिसराचा सामाजिक बाजही बदलला आहे. कागल, कसबा सांगाव परिसरात त्याचे परिणाम दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगारांना शासनाकडून सहकार्याची गरज आहे. नवे प्रकल्प येण्याचे प्रमाण मंदावले आहेत. नागनवाडी जलसिंचन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना पर्यायी जमीन मिळाली नसल्याने गेली चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे. हीच अवस्था दूधगंगा प्रकल्पाच्या कालव्याची आहे. तालुक्यातील या कालव्याची खोदाई झाली; पण गेली दहा वर्षे पुढची कामे ठप्प झाली आहेत. ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते, त्याचे अस्तरीकरण झाले नसल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. कागल आणि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे.तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयात पूर्णवेळ हजर नसतात. परिणामी, जनतेच्या कामांचा खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.तालुक्यातील महत्त्वाच्या समस्यासरकारी गायराने, पाणंदीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे... दिवसेंदिवस वाढचमहसूल विभाग, सिटी सर्व्हे विभाग, रेशन धान्य विभागातील कामकाजाबद्दल जनतेमध्ये रोष, जाणीवपूर्वक दिरंगाईमुळे नागरिक वेठीस८६ पैकी केवळ ४२ गावांचाच सिटी सर्व्हेपंचायत समितीला नव्या प्रशासकीय इमारतीची गरजशेतकऱ्यांच्या रद्द झालेल्या कर्जमाफीमुळे शेतकरी आणि सेवा संस्था आर्थिक गर्तेत.बुडीत पतसंस्थांमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत... कार्यवाही नाही.कागल तालुका कृषी विभागाला स्वत:चे जागा कार्यालय नाही.लिंगनूर, कापशी भागात स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज.कागल तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा चिंताजनक.कागल शहराच्या समस्याकागल शहरासाठी सुधारित विकास आराखडा हवाजयसिंगराव तलाव पाणलोट क्षेत्र निश्चितीकरणाचे काम रखडलेलेमहामार्ग चौपदरीकरणातील कामाच्या त्रुटीमुळे नागरिकांना त्रासकागल ग्रामीण रुग्णालयात अद्ययावतअपघात विभाग हवाकागल पोलीस ठाणे इतिहासकालीन इमारतीत, नव्या इमारतीची गरजमुरगूड शहराच्या समस्यामुरगूड शहराच्या हद्दवाढीची गरजशहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा (पिण्याच्या) यंत्रणेची गरजमुरगूड शहरात एकही बगिचा नाहीमुरगूड बसस्थानकाची दुरवस्था - स्वतंत्र डेपोची गरजतहसील कार्यालयातील प्रतिज्ञापत्रे मुरगूडमध्येच मिळावीतपाणी समस्या शेतीसाठीचीतालुक्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला नागनवाडी प्रकल्प ४५ टक्के काम झाल्यानंतर रखडला आहे. या प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनावरून हे काम थांबले आहे.दूधगंगा प्रकल्पातून निढोरी शाखेतून निघालेले तीनही कालव्यांचे काम ठप्प आहे. काही ठिकाणी केवळ खोदाईच झालेली आहे, तर अस्तरीकरण नसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.शेती पंपाच्या वीजबिलाच्या आकारणीबद्दलही नाराजी.पाणी समस्या पिण्यासाठीचीगावागावांत नळपाणी पुरवठा योजना झाल्या आहेत; पण त्या दर्जेदार नाहीत. जलस्वराज्य प्रकल्पातील बहुतांश योजना कुचकामी, परिणामी पाणीपुरवठ्यावर परिणाम, दूषित पाण्याचा पुरवठा.ग्रामपंचायतींना पाणी योजना आणि रस्त्यावरील विजेची बिले भरणे अशक्य होत असल्याने वारंवार वीजपुरवठा तोडण्याचे प्रकार होतात.पंचतारांकित वसाहतीमध्ये नवीन प्रकल्प येईनात : दूधगंगा कालवा, नागनवाडी जलसिंचन प्रकल्पाचे कामही रखडलेजहाँगीर शेख ल्ल कागलतीन नद्यांचे वरदान लाभलेला कागल तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक जमीन सिंचनाखाली असलेला तालुका आहे. चार साखर कारखाने, दोन दूध संघ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध शैक्षणिक केंद्रे, दळणवळणाच्या सुविधा यांनी तालुका आज प्रगतिपथावर आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही तितक्याच गंभीर झाल्या आहेत.येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे येथे जसा रोजगार निर्माण झाला, तसा परिसराचा सामाजिक बाजही बदलला आहे. कागल, कसबा सांगाव परिसरात त्याचे परिणाम दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगारांना शासनाकडून सहकार्याची गरज आहे. नवे प्रकल्प येण्याचे प्रमाण मंदावले आहेत. नागनवाडी जलसिंचन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना पर्यायी जमीन मिळाली नसल्याने गेली चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे. हीच अवस्था दूधगंगा प्रकल्पाच्या कालव्याची आहे. तालुक्यातील या कालव्याची खोदाई झाली; पण गेली दहा वर्षे पुढची कामे ठप्प झाली आहेत. ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते, त्याचे अस्तरीकरण झाले नसल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. कागल आणि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे.तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयात पूर्णवेळ हजर नसतात. परिणामी, जनतेच्या कामांचा खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.