शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमास प्रियाला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:23+5:302021-06-22T04:18:23+5:30

कोल्हापूर : कोरोना काळात शववाहिकेवर काम करत तब्बल १०८ शव स्मशानभूमीपर्यंत पोहोच करणाऱ्या येथील प्रिया पाटील यांच्या कामाची दखल ...

Priya invited to Shahu Maharaj Janmotsav program | शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमास प्रियाला निमंत्रण

शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमास प्रियाला निमंत्रण

Next

कोल्हापूर : कोरोना काळात शववाहिकेवर काम करत तब्बल १०८ शव स्मशानभूमीपर्यंत पोहोच करणाऱ्या येथील प्रिया पाटील यांच्या कामाची दखल शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी घेतली. त्यांनी प्रियाला येत्या २६ जूनला होणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमाच्या पहिल्या निमंत्रणाचा मान दिला. यासंबंधीचे पत्रही त्यांनी दिले. यावेळी शाहूंच्या जनक घराण्याचा वारस म्हणून बहुजनांसाठी काम करणाऱ्या प्रियाचा मला अत्यंत अभिमान वाटतो आणि म्हणूनच येत्या २६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमांमध्ये प्रिया यांनाच पहिल्या निमंत्रणाचा मान दिल्याचे घाटगे यांनी सांगितले.

फोटो : २१०६२०२१-कोल-प्रिया पाटील निमंत्रण

कोल्हापुरातील प्रिया पाटील यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव कार्यक्रमाच्या पहिल्या निमंत्रणाचा मानाचे पत्र समरजीत घाटगे यांनी दिले.

Web Title: Priya invited to Shahu Maharaj Janmotsav program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.