शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

खासगी शाळांना हव्या आहेत पालिकेच्या इमारती

By admin | Updated: July 28, 2014 23:18 IST

पालिका शाळांतील पटसंख्या रोडावली : खासगी शाळांचा इमारतींवर डोळा

इचलकरंजी : शहरात खासगी शैक्षणिक संस्थांना बरकतीचे दिवस आले असून, याउलट पालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची रोडावली आहे. साहजिकच शाळांच्या रिकाम्या पडलेल्या इमारती-खोल्या भाड्याने घेण्याचा सपाटा खासगी शैक्षणिक संस्थांनी चालविला आहे.नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडे सुमारे ५० शाळा असून, त्यामध्ये सध्या अकरा हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत आहेत. शहरात खासगी शिक्षण संस्थांचे प्रस्थ स्थापित होण्यापूर्वी शिक्षण मंडळाच्या शाळांतून सुमारे वीस हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करीत होते. मात्र, अलीकडील वीस वर्षांत खासगी शाळांचे पेव फुटले आणि शिक्षण मंडळाकडील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली.शिक्षण संस्थांचा व्याप वाढू लागल्यानंतर शहरात मध्यवर्ती ठिकाणी इमारती अपुऱ्या पडू लागल्या. त्यामुळे खासगी शाळांची नजर शिक्षण मंडळाकडील रिकाम्या शाळा व खोल्यांवर पडली. सध्या क्रांती हायस्कूलकडे एक, डीकेटीईकडे एक व कला महाविद्यालयाकडे एक इमारत आणि नाकोडा हिंदी विद्यालयाकडे काही खोल्या भाड्याने आहेत. अशा प्रकारे अन्य ठिकाणी असलेल्या इमारती व खोल्यांवरही खासगी शाळांचा डोळा आहे.नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये नाकोडा एज्युकेशन सोसायटीला शाळा क्रमांक ६ व १३ मधील रिकाम्या सात खोल्या भाड्याने देण्याचा विषय चर्चेला येताच कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी हा विषय सभेत घेऊ, असे सूचविले. त्यावर कॉँग्रेसचेच नगरसेवक भीमराव अतिग्रे यांनी, संस्थेशी वाटाघाटी करण्यास वेळ पाहिजे का, असा खळबळजनक प्रश्न विचारला. त्यामुळे सभागृहात काही वेळ गदारोळ उडाला. तसेच ब्राह्मण समाज सभेची डेक्कन एज्युकेशन सोसायटीसुद्धा गेले सात-आठ वर्षे शाळेच्या खोल्यांची मागणी करीत आहे. आता राजकीय वजन असलेल्या संस्थांना इमारत किंवा खोल्या मिळतात. अन्य सामान्यांना लटकत ठेवले जाते, अशी चर्चा शहरात रंगली आहे. (प्रतिनिधी)-‘मिस्त्री’ अशा नावे प्रसिद्ध असलेल्या शहरातील... मळा नावाच्या वसाहतीत एका खासगी शैक्षणिक संस्थेने काही रकमेची अनामत भरून कोणत्याही प्रकारचे भाडे न देता शाळेच्या खोल्यांचा वापर चालू केला आहे. -त्याबाबत नगरपालिका किंवा शिक्षण मंडळ कोणतीच वाच्यता करीत नसल्याचे आश्चर्य नागरिकांतून होत आहे. -या व्यवहारात काहींचे हात गुंतल्याचीही चर्चा आहे.