शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उठावाचे पुन्हा खासगीकरण--आयुक्तांचे सूतोवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनकचरा व्यवस्थापनाचा डीपीआर तयार झाला असून पंधरा दिवसांत त्याचे सादरीकरण करण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घंटागाडीद्वारे कचरा संकलित करण्यासाठी निविदा काढण्यात येतील, असे महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी सांगितले. ठोकमानधनावर सफाई कर्मचारी घेण्याऐवजी कचरा उठावाचेच खासगीकरण केले जाईल, असे आयुक्तांच्या या निवेदनातून समोर आले आहे. महापौर ...

ठळक मुद्देप्रलंबित कामांचा महापौरांकडून आढावा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, कळंबा तलावातील लिकेज आदी प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनकचरा व्यवस्थापनाचा डीपीआर तयार झाला असून पंधरा दिवसांत त्याचे सादरीकरण करण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घंटागाडीद्वारे कचरा संकलित करण्यासाठी निविदा काढण्यात येतील, असे महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी सांगितले. ठोकमानधनावर सफाई कर्मचारी घेण्याऐवजी कचरा उठावाचेच खासगीकरण केले जाईल, असे आयुक्तांच्या या निवेदनातून समोर आले आहे. महापौर हसिना फरास व स्थायी समिती अध्यक्ष संदीप नेजदार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी ही माहिती दिली.विद्युत, आरोग्य व उद्यान विभागांकडे कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे कामे पूर्ण क्षमतेने होत नाहीत. सन १९७२ चे कर्मचारी आकृतिबंध आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांवर कामाचा ताण पडत त्यामुळे यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे नेजदार यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

बैठकीत आरोग्य विभागाकडील ३०० झाडू व सफाई कामगार ठोक मानधनावर घेणे, प्रत्येक प्रभागात २ ते ३ जादा कर्मचारी देणे, घनकचरा व्यवस्थापनचा डीपीआर, झूमवरील इनर्ट मटेरियल हलविणे, लँडफिल साईट, नालेसफाई, नाला चॅनेलायझेशन, एलईडी दिवे बसविणे, पंतप्रधान आवास योजना, मल्टिलेव्हल कार पार्किंग, सेफ सिटी दुसरा टप्पा, वाय फाय सिटी, केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण दुसरा टप्पा, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, दुकानगाळे भाडेपट्टी, जेट मशीन, बुम, जेसीबी व इतर वाहने खरेदी, स्क्रॅप लिलाव, अमृत योजतून मंजूर ५८ कोटी निधीतून ड्रेनेज लाईन टाकणे, अमृत योजना मंजूर ११० कोटी निधीतून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, कळंबा तलावातील लिकेज आदी प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला.

घंटागाडीद्वारे कचरा संकलित करण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा डीपीआरचे सादरीकरण करण्यात येईल. नाले सफाईसाठी जो पोकलॅण्ड आवश्यक आहे त्याची किंमत ६७ लाख रुपये आहे शिवाय मेटेंनन्स, डिझेल खर्च, कर्मचारी पगार व इतर खर्च पाहता तासाला रु.१३५०/- खर्च येत आहे. त्यामुळे पोकलॅण्ड खरेदी करावा की भाडेतत्त्वावर घेण्यात यावा याबाबत विचारविनिमय सुरू आहे, असे आयुक्तांनी सांगितले.