शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय, खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:01 IST

ज्येष्ठ नागरिकांबाबत संबंधित विभागाने कृती आराखडा महिन्याभरात तयार करावा. विविध विभागाने ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने सुविधा पुरवाव्यात.

ठळक मुद्दे  कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.  कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर : जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा देताना त्यांना रांगेत उभे न करता उपचारासाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले. याबाबत तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

जिल्हाधिकारी आयोजित जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख, समाजकल्याण निरीक्षक संजय पवार, ‘सीपीआर’च्या अधीक्षक डॉ. तेजस्विनी सांगरूळकर, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव विलास नांदवडेकर, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समितीचे अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप, शहर अध्यक्ष दिलीप पेटकर, संजय पाटील, फारूक देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.डॉ. जगताप यांनी यावेळी ज्येष्ठ नागरिक समस्या निवारणाबाबत विविध मागण्या सादर केल्या.यावर जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘आरोग्य सुविधेबाबत ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे राहणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घ्यावी. अतिदक्षता रुग्णांवरील उपचार वगळता शासकीय तसेच खासगी रुग्णालयांनीही ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावे. याबाबत समाजकल्याण विभागाने कोल्हापूर वैद्यकीय संघटनेला पत्र लिहावे. ज्येष्ठ नागरिकांबाबत संबंधित विभागाने कृती आराखडा महिन्याभरात तयार करावा. विविध विभागाने ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने सुविधा पुरवाव्यात. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर