शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

प्रादेशिक समस्यांवरील संशोधनाला प्राधान्य द्यावे

By admin | Updated: December 11, 2014 00:31 IST

मिलिंद सोहोनी : शिवाजी विद्यापीठातील आयोजित परिसंवादातील सूर

कोल्हापूर : स्थानिक व प्रादेशिक समस्या समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक व संशोधन कार्यक्रम राबविण्यास विद्यापीठांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन आयआयटी (मुंबई)चे प्रा. डॉ. मिलिंद सोहोनी यांनी आज, बुधवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आयोजित ‘जल व ग्रामीण विकासाच्या क्षेत्राची सद्य:स्थिती व संधी’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत होते. प्रा. सोहोनी म्हणाले, विद्यापीठ हे उद्योग व समाज यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यापीठाकडून पूर्वी केवळ कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या अपेक्षा होत्या. मात्र, आता बदलत्या परिस्थितीत त्यांनी समाजमानसाला मार्गदर्शन करणाऱ्या उपयुक्त सल्लागाराची भूमिका बजावावी. त्यातून ज्ञाननिर्मिती, विकासासह नवनवीन रोजगार संधीच्या निर्मिती शक्य आहे. विद्यार्थ्यांच्या व्यापक सहभागातून शासकीय यंत्रणेला समांतर व पूरक यंत्रणा विकसित करण्याची जबाबदारी विद्यापीठांवर आहे. डॉ. राऊत म्हणाले, विद्यापीठे ही शिक्षण आणि संशोधनाच्या बाबतीत अग्रेसर आहेत, तथापि, त्यांनी आता समाजाभिमुख सहभागामध्ये वाढ करण्याची गरज आहे. समाजाला ग्रासलेल्या समस्यांचे अभ्यास प्रकल्प हाती घेऊन त्याचे अहवाल शासनाकडे द्यायला हवेत. यावेळी प्रा. एस. एम. भोसले, सहायक प्रा. ए. सी. रणवीर, सहायक प्रा. एन. आर. सुतार, अमोल कुलकर्णी, आदी उपस्थित होते. उपकुलसचिव कॅप्टन डॉ. एन. पी. सोनजे यांनी स्वागत केले. तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्र्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एम. एस. साळुंखे यांनी परिचय करून दिला. डॉ. पी. पी. फडणीस यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. साहू यांनी आभार मानले.दुष्काळ निवारणासाठी निव्वळ शासकीय निधी नको...पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि दुष्काळ या सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर भेडसावणाऱ्या व भविष्यात उग्र स्वरूप धारण करू शकणाऱ्या समस्या आपल्यासमोर उभ्या असल्याचे डॉ. सोहोनी यांनी सांगितले. ते म्हणाले, केवळ शासकीय पातळीवरून निधी उपलब्ध केल्याने त्यांची भीषणता संपुष्टात येणार नाही. त्यासाठी जमिनीवरील तसेच भूमिगत पाण्याचे योग्य व्यवस्थापन, त्याबाबतचे सर्वंंकष धोरण व आखणी या माध्यमातूनच दूरगामी उपाययोजना करणे शक्य होईल. त्यासाठी शासनाच्या संयुक्त प्रकल्पांबरोबरच अगदी जिल्हा-तालुका स्तरांवर संशोधन केंद्रांची निमिर्ती व्हावी.