शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनधारा’च्या मुख्य वितरकावर छापा -: सरकारी औषधांची विक्री प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 01:08 IST

औषध पुरवठा करणाºया ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावर बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून त्याच्याकडील औषधसाठ्याची तपासणी केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी सहभागी असणाऱ्यांची धावाधाव सुरू होती.

ठळक मुद्दे ‘ओम सर्जिकल्स’च्या औषधसाठ्याची दिवसभर तपासणी

कोल्हापूर : सरकारने पुरविलेल्या औषधांची ‘सीपीआर’मधील औषध दुकानांतून विक्री झालेल्या प्रकरणातून रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. ‘नॉट फॉर सेल’ची औषधे विक्री करणाऱ्या जीवनधारा मेडिकल स्टोअर्सला औषध पुरवठा करणाºया ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावर बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून त्याच्याकडील औषधसाठ्याची तपासणी केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी सहभागी असणाऱ्यांची धावाधाव सुरू होती.

सरकारने शासकीय रुग्णालयांसाठी पुरविलेली व बाहेर विक्रीसाठी परवानगी नसलेली (नॉट फॉर सेल) औषधे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारातील जीवनधारा औषध दुकानातून ‘सीपीआर’मधील रुग्णांना विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १५) उघडकीस आला.महिलेच्या प्रसूती शस्त्रक्रियेवेळी वापरण्यात येणारे ‘कॅटगर्ट’ हे औषधी कीट सोमवारी (दि. १५) जीवनधारा मेडिकल स्टोअर्समधून सीपीआर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांना विकण्यात आले; पण हे ‘कॅटगर्ट’ कीट सरकारने पुरविलेले व त्यावर ‘नॉट फॉर सेल’ असा स्पष्ट उल्लेख असतानाही ते खासगी मेडिकल स्टोअर्समधून विकले कसे गेले?

जीवनधारा मेडिकल स्टोअर्समधील औषधसाठ्याची अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी (दि. १६) दिवसभर तपासणी केली. ‘जीवनधारा’ला औषध पुरवठा करणाºया येथील महाराणा प्रताप चौकानजीकच्या ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावरही बुधवारी दुपारी अन्न औषध प्रशासनाने छापा टाकून तपासणी सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती.गोपनीय पथक कार्यरतसरकारने पुरविलेली औषधे खासगी औषध दुकानांतून विकली कशी जातात? ती औषधे तेथे कशी पोहोचली? त्यामध्ये कोण-कोण सामील आहेत? याबाबत रॅकेट कार्यरत असल्याच्या संशयात भर पडल्याने या प्रकरणाची चौकशी करून त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे आदेश राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार ‘सीपीआर’मधील अधिकाºयांचे पथक कार्यरत केले असून, ते गोपनीय पद्धतीने माहिती गोळा करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.अधिकाºयांवर दबाव : जीवनधारा या मेडिकल स्टोअर्सला औषध पुरवठा करणाºया ओम सर्जिकल या मुख्य वितरकावर छापा टाकून त्याच्या औषधसाठ्याची तपासणी सुरू असताना एका सामाजिक कार्यकर्त्याने अन्न व औषध प्रशासनाच्या तपासी अधिकाºयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ही माहिती फोनवरून मुख्य कार्यालयास कळविल्यानंतर कार्यालयातील काही कर्मचारी तेथे गेले असता त्या सामाजिक कार्यकर्त्याने पलायन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmedicinesऔषधं