कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये तीन पानी पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या परमिट रूम बीअरबारच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून अकरा जणांना अटक केली. कारवाईत पोलिसांनी २७ हजारांची रोकड, ९० हजारांची दारू, आदींसह सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भोगावती रोडवर कांडगाव (ता. करवीर) येथील किरण परमिट बार आणि रेस्टॉरंटवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली.
अटक केलेले संशयित असे : संतोष बळवंत घोटणे, (वय ३०), आकाश संजय तांदळे (३०), जितेंद्र दिनकर घोटणे (३०), उदय श्यामराव लांडगे (३२), कुमार यशवंत मांगलेकर (३०), रणजित मधुकर मगदूम (२५), उत्तम आनंदा घोटणे (४६, सर्व रा. कांडगाव), प्रवीण कृष्णात पाटील (३५), उत्तम बाबूराव पाटील (३६), सरदार दिनकर पाटील (३३), योगेश शिवाजी पाटील (३०, सर्व रा. देवाळे, ता. करवीर). जागा मालक किरण विजय पाटील (रा. कांडगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये परमिट रूम व रेस्टाॅरंट बंद आहेत; पण भोगावती रोडवरील कांडगाव येथील किरण परमिट बार आणि रेस्टॉरंटमध्ये चोरून दारू विक्री सुरू आहे, तसेच तेथे पत्त्याचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यांनी तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री तेथे छापा टाकला. या कारवाईत ११ जणांना तीन पानी पत्त्याच्या पानांचा जुगार खेळताना अटक केली, तसेच येथे बेकायदेशीररीत्या ९० हजार रुपये किमतीची विदेशी दारू मिळाली.
या कारवाईत २७ हजार ८०० ची रोकड, विदेशी दारू, नऊ मोबाइल संच, एक डीव्हीआर मशीन, पाच दुचाकी, असा सुमारे २ लाख ९८ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फोटो नं. १६०५२०२१-कोल-कांडगाव०१
ओळ : भोगावती रोडवर कांडगाव (ता. करवीर) येथे कोरोना कालावधीत बंद बीअरबारमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ११ जणांना अटक केली.
फोटो नं. १६०५२०२१-कोल-कांडगाव०२
ओळ : पोलिसांनी अड्ड्यावर सुमारे ९० हजारांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला.
===Photopath===
160521\16kol_24_16052021_5.jpg~160521\16kol_25_16052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. १६०५२०२१-कोल-कांडगाव०१ओळ : भोगावती रोडवर कांडगाव (ता. करवीर) येथे कोरोना कालावधीत बंद बिअरबारमध्ये सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ११ जणांना अटक केली.फोटो नं. १६०५२०२१-कोल-कांडगाव०२ओळ : पोलिसांनी अड्ड्यावर सुमारे ९० हजाराचा विदेशी दारुचा साठा जप्त केला.~फोटो नं. १६०५२०२१-कोल-कांडगाव०१ओळ : भोगावती रोडवर कांडगाव (ता. करवीर) येथे कोरोना कालावधीत बंद बिअरबारमध्ये सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ११ जणांना अटक केली.फोटो नं. १६०५२०२१-कोल-कांडगाव०२ओळ : पोलिसांनी अड्ड्यावर सुमारे ९० हजाराचा विदेशी दारुचा साठा जप्त केला.