शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

इचलकरंजीत गुटखा कारखान्यावर छापा

By admin | Updated: August 20, 2015 00:54 IST

मशिनरींसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी : जुना चंदूर रोड परिसरात आर्यन गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून सुगंधी पान मसाला,अत्याधुनिक मशिनरी, तयार गुटखा, मावा असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच यावेळी दोन गोदामांवर छापे टाकण्यात आले. ही कारवाई पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संयुक्तपणे बुधवारी केली. अवघ्या वर्षभराच्या अवधीत याच कारखान्यावर दुसऱ्यांदा झालेल्या कारवाईमुळे या कारखान्याला अभय कोणाचे आहे, याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.इचलकरंजी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची निर्मिती व विक्री राजरोसपणे सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह बुधवारी सकाळी शहरात छापे टाकण्यास सुरूवात केली. पहिल्यांदा एएससी कॉलेजसमोरील सुनील बिरंजे याच्या भाग्यलक्ष्मी पान शॉपवर छापा टाकला. यावेळी विविध कंपन्यांचे सुमारे सात ते आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर या पथकाने तीनबत्ती चौक परिसरात असलेल्या सचिन रामविलास पारीक याच्या बालाजी सुपारी सेंटर या दुकानाच्या पिछाडीस असलेल्या गोदामावर छापा मारला. त्याठिकाणी विविध कंपन्यांचा गुटखा व पान मसाल्याचा मोठा साठा जप्त केला. दरम्यान, जुना चंदूर रोड परिसरातील वर्षभरापूर्वी राजू पाच्छापुरे या संशयिताच्या बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. याच ठिकाणी पुन्हा गुटखा तयार होत असल्याचा संशय आल्याने पोलीस उपअधीक्षक नरळे यांनी अन्न व औषध प्रशासन पथकाच्या सहायाने संयुक्त कारवाई करीत कारखान्यावर छापा टाकला. रस्त्यालगतच असलेल्या कारखान्याच्या इमारतीत सुमारे तीन श्वान असल्याने पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला आत जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. त्यानंतर बंद असलेल्या कारखान्याचे दरवाजे फोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी आतील बाजूस आर्यन या नावाचा बनावट गुटखा तयार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. याठिकाणी गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे सहा लाख रुपये किमतीच्या चार मशिनरी असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर १८ पोती कच्चा गुटखा, आठ पोती मावा, तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधी पानमसाला, लाकडी भुसा, याचबरोबर गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिकची पोती, सुगंधी सुपारी, चुना पावडर, आर्यन नाव छापलेले पाऊच पॅकिंग, गुटखा तयार करण्यास लागणारी तंबाखू पावडर, तपकिरी रंगाची तंबाखू, पॅकिंग मशीन, पावडर दळण्याचे मशीन असा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. यािठकाणी असलेल्या वीज मीटरवर राजू पाच्छापुरे यांचे नाव असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच या कारखान्यापासून अवघ्या काही अंतरावर दुर्गामाता मंदिरानजीक असलेल्या गल्लीमध्ये आणखी एका गोदामावरही छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी विविध कंपन्यांच्या गुटख्यांचा मुद्देमाल हाती लागला. दिवसभरातील या सर्व कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची मोजदाद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी भेट देऊन माहिती घेतली. कारवाईत पोलीस उपअधीक्षक नरळे व त्यांचे पथक, तसेच अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त एस. एस. चौगुले, एस. एम. देशमुख यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी अभिनंदन रणदिवे, संतोष सावंत, बी. डी. मुळे, एम. डी. पाटील, आदींसह शिवाजीनगरचे निरीक्षक संजय साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. खाडे, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. मुजावर यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण कर्नाटकात मोठ्या प्रमाणात सुगंधी पान मसाला येथून पुरवठा होत असल्याचे या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)अनेक कारवायांत आढळला ‘आर्यन’ जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने गुटखा साठ्यांवर कारवाया केल्या. यामध्ये आर्यन गुटखा असल्याचे आढळून आले. तरीही दोन्ही विभागांनी गेल्यावर्षी आर्यन गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकला असताना हा गुटखा पुन्हा तयार होऊन मार्केटमध्ये येतो कुठून, याची तपासणी कधीच केली नाही, हे आश्चर्य.या परिसरातील पोलीस कसे अनभिज्ञ?कारवाई झालेल्या कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर दुर्गामाता मंदिर आहे. या परिसरात गतवर्षी दोन कारखानदारांचे खून झाले होते. त्यामुळे या परिसरात एक इचलकरंजीत बुधवारी अवैध गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून केलेल्या कारवाईची पाहणी करताना जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे संपत देशमुख, सुकुमार चौगुले, अभिनंदन रणदिवे, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, आदी.कायमस्वरूपी पोलिसाची नेमणूक केली आहे. रात्रंदिवस कारखान्यातून राजरोसपणे गुटख्याची वाहतूक केली जात असताना पोलिसांना माहित कसे होत नाही असा सवाल भागातील नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.