शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री सुरक्षा योजनेत दहा लाखांवर खाती

By admin | Updated: June 14, 2016 00:18 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : वारसांना अडीच कोटींची मदत; बचत गटासाठी प्रशिक्षण

कोल्हापूर : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि अटल विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १० लाख ८ हजार ६७१ खाती उघडण्यात आली असून, यापुढील काळात सर्व बँकांनी या विमा योजनांतर्गत अधिकाधिक खाती उघडण्यात सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शुक्रवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सैनीबोलत होते. बैठकीस आमदार डॉ. सुजित मिणचेकर, रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी. एस. पराटे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी. के. आरसेकर, जिल्हा मध्यवर्र्ती बँकेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण, प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम. जी. कुलकर्र्णी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बॅँकांचे जिल्हा समन्वयक आणि अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५१ हजार ७४० खाती उघडण्यात आली. मार्च २०१६ अखेर १२ दावे मंजूर करण्यात आले. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत तीन लाख ४७ हजार १८९ खाती उघडण्यात आली. आतापर्यंत ११३ दावे मंजूर करून संबंधितांच्या वारसांना अडीच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. या योजनांच्या नूतनीकरणाचे काम सर्व बँकांमध्ये सुरू असून, खातेदारांनी आपल्या बचत खात्यामध्ये पुरेशी शिल्लक ठेवून विमा योजनांचे नूतनीकरण करावे. जीवन ज्योती योजनेत दावा पात्रता ही ४५ दिवसांची करण्यात आल्याने पॉलिसी सुरू झाल्यापासून ४५ दिवसांनंतर दावा मंजूर करण्यात येईल. या सर्व योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी अधिकाधिक बचत गटांना यात सामावून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सैनी यांनी केले. अटल विमा योजनेंतर्गत ९ हजार ७४२ खाती उघडण्यात आली. याबरोबरच पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत जिल्ह्यात ५ लाख १३ हजार ८५४ खाती उघडण्यात आली. ३ लाख ६२ हजार ३१६ खात्यांसाठी रूपे कार्ड प्रदान करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील उद्योजकांना २३ हजार २७१ खात्यांमध्ये अर्थसाहाय्य करण्यात आले. यामध्ये शिशू योजनेंतर्गत १९ हजार ८२० खात्यांमध्ये किशोर योजनेंतर्गत २ हजार ७५१ खात्यांमध्ये आणि तरुण योजनेंतर्गत ७०० खात्यांमध्ये अर्थसाहाय्य करण्यात आले. जिल्ह्यात बचत गटांच्या महिलांसाठी आर-सेटी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले असून, या केंद्रामार्फत २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.बँकांतील ठेवींमध्ये १२०० कोटींची वाढ अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम. जी. कुलकर्र्णी यांनी सांगितले की जिल्ह्यातील प्राथमिकता सेवा क्षेत्राकरिता ५०४० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. मार्च २०१६ साठी दिलेल्या उद्दिष्टाच्या ५१२४.६४ कोटींचा वित्तपुरवठा प्राथमिकता क्षेत्राकरिता जिल्ह्यातील सर्व बँकांनी केला. या वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व बॅँकांच्या ठेवींमध्ये एक हजार १९६ कोटी वाढ होऊन त्या १९ हजार ३९१ कोटी इतक्या झाल्या आहेत. कर्जामध्ये ९६३ कोटींची वाढ होऊन जिल्ह्यामध्ये प्राथमिकता क्षेत्रासाठी दिलेल्या कर्जाची रक्कम १५ हजार ७६९ कोटी इतकी झाली. सन २०१६-१७ करिता वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये पीककर्जासाठी २ हजार ६८८ कोटी इतके उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. आर्थिक साक्षरता केंद्रकोल्हापूरमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले असून, या केंद्रामार्फत वेगवेगळ्या गावांमध्ये बँकिंग साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिक साक्षरतेसाठी महिन्यातून किमान एकवेळ ग्रामीण भागात कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले.