शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
4
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
5
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
6
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
7
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
8
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
9
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
10
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
11
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
12
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
13
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
14
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
15
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
16
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
17
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
18
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
19
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
20
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुरलीधर जाधवांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By admin | Updated: February 11, 2015 00:15 IST

क्रिकेट बेटिंग प्रकरण : दोन पंटरांवरही राजारामपुरी पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : विश्वचषक स्पर्धेदरम्यान क्रिकेट सट्टा जोमाने सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट सट्टा प्रकरणात अडकलेले महापालिकेचे विरोधी पक्षनेते, नगरसेवक मुरलीधर पांडुरंग जाधव (वय ४६, रा. राजारामपुरी) याच्यासह त्याच्या दोघा पंटरांवर राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई केली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई केली. टाकाळा येथील नगरसेवक जाधव यांच्या जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये २३ जानेवारीला राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकला असता पंटर प्रकाश श्रीचंद जग्याशी (४०) व लक्ष्मण सफरमल कट्यार (२५, रा. गांधीनगर) हे दोघे आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेताना मिळाले होते. याप्रकरणी नगरसेवक जाधव यांनी जामीन मिळविला होता. मात्र प्रशासनाने जाधव यांचा जामीन रद्द करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन (अपील) दाखल केले आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान क्रिकेट सट्टा होवू शकतो. त्यामुळे गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी नगरसेवक जाधव व त्यांच्या पंटरांवर कारवाई केली. राजकीय दबावामुळेच कारवाई : जाधवगेली दहा वर्षे नगरसेवक आहे. कुटुंबीयांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. बेटिंगप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून अटक केलेले संशयित व संबंधित फ्लॅटशी काहीही संबंध नाही. न्यायालयानेही ही बाजू ग्राह्य धरत अटकपूर्व जामीन मंजूर केला. पोलिसांना संपूर्ण तपासकामात सहकार्य करत असताना पोलीस निव्वळ राजकीय दबावापोटी प्रतिबंधात्मक कारवाई करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव यांनी पत्रकाद्वारे केला आहे. जाधवचा रूबाब अंगामध्ये पांढराशुभ्र पोशाख, हातामध्ये किमती मोबाईल अशा पेहराव्यात नगरसेवक जाधव महापालिकेच्या आलिशान गाडीतून सकाळी अकराला पोलीस ठाण्यात आले. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी त्यांच्यासह पंटरांवर ‘कलम १०७’ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली. ठाण्यातील दप्तरी कक्षामध्ये त्यांच्याकडून जबाब लिहून घेतले.मुख्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर चांगल्या वर्तवणुकीचा बाँड लिहून घेवून त्यांची सुटका केली.