शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळमुक्ती, शेतकरी सक्षमीकरणाला प्राधान्य

By admin | Updated: March 23, 2017 00:35 IST

अर्थसंकल्पावरील चर्चासत्र : विविध तरतुदींबाबत तज्ज्ञांनी मांडली व्यापक मते

कोल्हापूर : शेती, दुष्काळ, पायाभूत सुविधा यासारख्या प्रश्नांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणारा हा अर्थसंकल्प आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन उपाययोजनेद्वारे सक्षम आणि दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात शासनाने ठोस पावले उचलली आहेत. कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकरी कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी शेती सिंचन, कौशल्य विकास, रस्ते विकास अशा पायाभूत सुविधांसाठी तरतूद केली आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी शाहू स्मारक भवन येथे ‘अर्थसंकल्प राज्याचा, संकल्प विकासाचा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. विजय ककडे, भारती विद्यापीठाच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. नितीन नायक, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रुझ यांनी सहभाग घेतला.विजय ककडे म्हणाले, सामाजिक न्याय, रोजगार, शिक्षण, ग्रामीण विकास, वैद्यकीय सेवा, पर्यावरण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांना वाव देणाऱ्या या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा मोह टाळत महागाई कमी करण्यासाठी हातभार लावणारा आणि कर्जमाफीबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. डॉ. नितीन नायक म्हणाले, अर्थसंकल्पात उच्चशिक्षणासाठी भरीव तरतूद अपेक्षित होती. प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमावर दिलेला भरमहत्त्वाचा आहे. ललित गांधी म्हणाले, व्यापार उद्योगाच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तरतूद होणे गरजेचे आहे.दशरथ पारेकर म्हणाले, अर्थसंकल्प सामान्य माणसाला समजेल, असा सोपा सुटसुटीत करण्याची पद्धती यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत आहे. जॉर्ज क्रुझ म्हणाले, शिक्षण, सामाजिक न्याय यासारख्या क्षेत्रामध्ये शासन भरीव तरतूद करत असले तरी हा निधी संपूर्णपणे खर्च करण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी चर्चासत्राची रूपरेषा विशद केली. एस. आर. माने यांनी स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी परिचय करून दिला. माहिती सहायक अर्चना माने यांनी आभार व्यक्त केले. या कार्यशाळेस वृत्तपत्र विद्याविभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, गोविंद गोडबोले तसेच वृत्तपत्रांचे, माध्यमांचे प्रतिनिधी, आदी उपस्थित होते...तर तूट होणार नाहीयावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांनी विचारलेल्या धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण करता येईल का, या प्रश्नावर विजय ककडे म्हणाले, सर्वच जाती-धर्माच्या धर्मस्थळांचा पैसा व्यवहारात आला तर पुढची पाच वर्षे शासनाचा अर्थसंकल्प तुटीशिवाय सादर होईल. शेतकरी मरताहेत, दुसरीकडे धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या देशात शाळांना छप्पर नाही व धार्मिक स्थळांना संगमरवरी फरशी चकाचक केले जाते. याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.