शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हातात ‘धनुष्या’ऐवजी ‘घड्याळा’साठी दबाव-: सतेज पाटील यांची विरोधाची धार बोथट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:09 IST

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात उघडलेल्या मोहिमेची धार बोथट करण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसच्या

ठळक मुद्देदोन्ही काँग्रेसमध्ये हालचाली ; दोन दिवसांत ‘हायकमांड’कडून फर्मान

कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात उघडलेल्या मोहिमेची धार बोथट करण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसच्या पातळीवर सुरू आहे. पाटील यांच्या विरोधी प्रचाराची गंभीर दखल घेतली असून, दोन दिवसांत ‘हायकमांड‘कडून काही तरी फर्मान येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विधानसभेच्या सन २००९ च्या निवडणुकीपासून जिल्ह्यात महाडिक-सतेज पाटील संघर्ष सुरू आहे. मागील लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून दोघांमध्ये समझोता घडविला. त्यामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती; पण लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक यांना रिंगणात उतरले आणि पुन्हा संघर्ष पेटला. गेली पाच वर्षे या संघर्षाची धार अधिक तीव्र होत गेली. आता लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली, पण आमदार पाटील यांनी महाडिक यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे आमदार असतानाही त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर जाऊन प्रचार सुरू केला. त्यांच्या या भूमिकेने काँग्रेसमध्ये अस्वस्थता असली तरी याबाबत उघड विचारणा करण्याचे धाडस कोणी करायचे? असा पेच काँग्रेसअंतर्गत आहे.

गेल्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी दोन्ही नेत्यांत समेट घडवून आणला होता, आता त्यांनी त्यासाठी वेळ घालवणार नसल्याचे सांगत यातून अंग काढून घेतले.पाटील यांचा विरोध असायला हरकत नाही; पण त्यांनी उघड टोकाची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाटील यांनी शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सारी यंत्रणा हातात घेतल्याची कात्रणे वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याची गंभीर दखल दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर घेतल्याचे समजते. येत्या दोन दिवसांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पातळीवर चर्चा होणार आहे. प्रचारात सक्रिय व्हायचे राहू दे, पण किमान पाटील यांच्या विरोधाची धार कशी बोथट करता येईल, यासाठी फर्मान निघेल, अशी चर्चा दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू आहे.चुकीचा संदेश जाण्याअगोदर आवरा!दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेत भाजपला रोखण्याची व्यूहरचना आखली असताना कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार उघड शिवसेनेच्या प्रचारात आहेत. हा संदेश महाराष्टÑात गेला तर दोन्ही काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी माजेल, अशी भीती राष्टÑवादीला आहे. त्यामुळे चुकीचा संदेश इतर मतदारसंघांत जाण्याअगोदर पाटील यांना आवरण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक