शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम सभापतींची कामे अध्यक्षांनी थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:33 IST

Zp Kolhapur- कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी राजीनामा प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. राजीनाम्यासाठी तयार नसणारे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी मंजूर केलेली एक कोटी रुपयांची कामे थांबवण्यासाठी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्रच दिले आहे.

ठळक मुद्देबांधकाम सभापतींची कामे अध्यक्षांनी थांबवली जिल्हा परिषदेतील राजीनामा प्रकरणाला वेगळे वळण

कोल्हापूर -जिल्हा परिषदेतील पदाधिकारी राजीनामा प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. राजीनाम्यासाठी तयार नसणारे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी मंजूर केलेली एक कोटी रुपयांची कामे थांबवण्यासाठी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्रच दिले आहे.जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा प्रश्न शिवसेनेच्या तिघाही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे न दिल्याने चिघळला आहे. शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू असून, स्वाती सासने आणि प्रवीण यादव यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. मात्र माजी आमदार सत्यजित पाटील यांनी वेगळी भूमिका घेतल्याने बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही. जेव्हा सत्यजित पाटील सांगतील तेव्हा राजीनामा देणार, असे ते सांगत असून, त्यांनी राजीनामा दिला की आम्ही दोघेही राजीनामा देतो, अशी भूमिका यादव आणि सासने यांनी घेतली आहे.या सगळ्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांना कालावधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी हंबीरराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी काही स्पष्ट सूचना केल्याचे सांगण्यात आले. त्याही पुढे जात आता थेट अध्यक्ष बजरंग पाटील यांनाच कामांचे कार्यारंभ आदेश देऊ नयेत, असे लेखी पत्र दिल्यामुळे आता हे प्रकरण वेगळ्या टप्प्यावर आले आहे. पाटील हे बुधवारी दिवसभर जिल्हा परिषदेत नव्हते. मात्र ते गुरुवारी येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामा प्रकरण विनाकारण ताणवले जात असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलदेखील नाराज असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर