शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

सांगलीतील दारूबंदी आंदोलनाची राष्ट्रपतींकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 23:31 IST

सांगलीतील दारूबंदी आंदोलनाची राष्ट्रपतींकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका क्षेत्रातील दारूची दुकाने बंद करण्यासाठी शेखर माने युथ क्लबने एक लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना दिले होते. त्याची दखल राष्ट्रपतींनी घेतली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना केंद्रीय न्याय विभागाला दिल्या असल्याची माहिती नगरसेवक शेखर माने यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामागार्पासून पाचशे मीटर अंतरावरील सर्व दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाचे पालन महापालिका क्षेत्रात झाले पाहिजे, यासाठी शेखर माने युथ क्लबच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली होती. पथनाट्याद्वारे नागरिकांत जागृती करून दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यास विरोध दर्शविला होता. अनेक दिवस दारुबंदीच्या विरोधातील हे आंदोलन सुरू होते. केरळ, गुजरात, बिहार या राज्यात दारुबंदीचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रातही चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. उत्पन्न बुडेल, रोजगार बुडतील अशी वल्गना करणाऱ्यांना या राज्यांनी चपराक दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सांगली महापालिका क्षेत्रात कडक अंमलबजावणी व्हावी व नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य राहावे, यासाठी हा निर्णय घेतला होता. शिवाय टप्प्या-टप्प्याने दारू मनपा क्षेत्रातून हद्दपार व्हावी, या मागणीसाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबिविली होती. याला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. सुमारे एक लाख नागरिकांनी या निवेदनावर सह्या केल्या होत्या. नागरिकांच्या सह्यांचे हे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले होते.सर्वच राज्यांना दक्षतेबाबत दिले गेले निर्देशया निवेदनाची दखल राष्ट्रपतींनी घेतली आहे. दारूबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. राष्ट्रीय व राज्य महामार्गावर दारूबंदी आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यायच्या सूचना राष्ट्रपतींचे सचिव अभिजित रॉय यांनी केंद्रीय न्याय विभागाला दिल्या आहेत. शिवाय रॉय यांनी सर्व राज्यांना याबाबतचे आदेश देखील काढले असल्याची माहिती शेखर माने यांनी दिली. याबाबतचे राष्ट्रपती कार्यालयाचे पत्र मिळाले असल्याची माहितीही माने यांनी दिले.