या सभेत संस्थेपुढील सद्य:स्थितीतील आव्हाने, संस्थेच्या उज्ज्वल भावी वाटचालीसाठी मनुष्यबळ विकास, संस्थेच्या कार्याची प्रभावक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना, वारसा हस्तांतर, आदी विषयांवर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नवीन सदस्य नोंदणीत विविध क्षेत्रांतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. यावेळी डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. नसीमा हुरजूक, अयाज संग्रार, सुशील नाशिककर, प्राचार्य प्रमोद म्हांगोरे, श्रीकांत केकडे, ग्यानी बठेजा, आदी उपस्थित होते. या सभेनंतर अकरा जणांचा समावेश असलेल्या नूतन कार्यकारिणीची सभा झाली. त्यात खजानिसपदी अभिजित गारे, सचिवपदी तेजश्री शिंदे, सहसचिवपदी रमेश रांजणे आणि संघटकपदी रेखा देसाई यांची निवड झाली. कार्यकारिणीत डॉ. छाया देसाई, नंदकुमार मोरे, सुबोध मुंगळे, कौस्तुभ बंकापुरे, झाकीर बागवान हे विश्वस्तपदी आहेत. हॅण्डिहेल्प वेल्फेअर फौंडेशनच्या भगिनी नॉन-प्रॉफिट कंपनीच्या संचालकपदी देशपांडे, देशभ्रतार, मोरे, मुंगळे, उदय गोखले, प्रमोद थावरे यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रतिक्रिया
संस्थेचे नेतृत्व करताना विश्वस्त आणि संचालकांनी नवविचार, व्यवस्थापन, संवाद कौशल्य, समस्या निवारण ही कौशल्ये व सांघिक भावना विकसित करून गाभाभूत उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी स्वयंस्फूर्त सहभाग घ्यावा.
-पी. डी. देशपांडे