शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बिद्री कारखान्याचा अध्यक्ष भाजपचाच असेल

By admin | Updated: March 15, 2017 00:14 IST

चंद्रकांत पाटील : शिवडाव-सोनवडे घाटाचे काम पुढच्या मेअखेर पूर्ण करणार; गारगोटी येथे मेळावा

गारगोटी : भुदरगड-राधानगरी-आजरा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप चिन्हावरचा आमदार असेल, तर बिद्रीचा अध्यक्ष हा भाजप म्हणेल तो असेल. जिल्ह्याच्या विकासासाठी पाचशे कोटींचा निधी आणला असून, भुदरगड तालुक्यातील ३५ वर्षे प्रलंबित असणाऱ्या शिवडाव-सोनवडे घाटाचे काम पुढच्या मेअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही देत, निवडणुकीसाठी होणारा खर्च कमी करण्यासाठी मोदी सरकार विधासभा व लोकसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याचा निर्णय घेणार असल्याने मे २0१९ ला निवडणुका जाहीर होतील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.गारगोटी येथील इंजुबाई सभागृहात (सोनाळी) भुदरगड तालुका भाजप पार्टीच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळावा व सत्कार समारंभाच्या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख उपस्थित जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत होते.पाटील म्हणाले, भुदरगड तालुक्यातील विकासाची सुरुवात कधीच झाली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे मुदाळ तिठ्ठा ते आदमापूर दरम्यानचा उड्डाणपूल, कोल्हापूर-गारगोटी चार पदरी रस्ता, शिवडाव-सोनवडे घाट, पाल घाटातील प्रशस्त रस्ता ही बरीच कामे आहेत. भाजपच्या वाढीने विचार केला, तर आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा कार्यकर्ता निवडून जाणे गरजेचे आहे. ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई म्हणाले, भुदरगड तालुक्यात भाजपच्या पक्षांचा चढता आलेख पाहून आजदेखील तालुक्यातील अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. बिद्रीचे प्रशासकीय संचालक नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. बिद्रीचे प्रशासकीय संचालक रणजितसिंह पाटील, अलकेश कांदळकर, प्रवीण सावंत, देवराज बारदेसकर, प्रा. हिंदुराव पाटील, योगेश परुळेकर, संतोष पाटील, नामदेव चौगले, नूतन पं. स. सदस्या आक्काताई नलवडे, रामचंद्र सणगर, रणजित आडके, दिलीप केणे, सुनील पाटील, जयवंत चोरगे, एन. के. देसाई, भगवान शिंदे, सुशांत मगदूम, संतोष डेळेकर, पी. बी. खुटाळे, संजय भोसले, सुनील तेली, सुरेश सुतार, ए. डी. कांबळे, आनंदा रेडेकर, गणपतराव शेटके, लखन लोहार, शहराध्यक्ष राहुल चौगले, उपस्थित उपस्थित होते. विनायक परुळेकर यांनी आभार मानले.