शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचा अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:07 IST

कोल्हापूर : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मीळ आणि अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जमा झाला ...

कोल्हापूर : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मीळ आणि अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जमा झाला आहे. दानवे यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर येथे हा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला.

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे दानवे हे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. पुण्यात जन्मलेले दानवे यांनी अगदी सुरुवातीला मराठी आणि उर्दू नाटकांमध्ये कामे केली आणि त्यानंतर १९३० च्या सुमारास कोल्हापूर येथे चित्रपटमहर्षी भालजी पेंढारकर यांच्याकडे सहदिग्दर्शक म्हणून काम केले. साठ वर्षे अभिनय कलेची सेवा केली आणि स्वत:ची अशी विशिष्ट व्यक्तिरेखा खलनायकाच्या रूपाने मराठी रंगभूमी व रुपेरी पडद्यावर साकार केली.

दानवे यांनी सात चित्रपटांतून कामे केली. त्यांचा नाट्यसंसार १३४ नाटके व त्यांचे असंख्य प्रयोग इतका विस्तृत होता. सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बाबूराव पेंटर यांच्या 'सावकारी पाश' (१९३६), भालजी पेंढारकर यांच्या 'सासुरवास' ( १९४६), 'मीठभाकर' (१९४९), 'मोहित्यांची मंजुळा' (१९६३ ), 'मराठा तितुका मेळवावा' (१९६४) आणि दादा कोंडके यांच्या 'आंधळा मारतो डोळा' (१९७३), आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय होत्या. 'असिरे हवीश' या उर्दू चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. १९३० आणि १९४० च्या दशकांत त्यांनी अनेक हिंदी आणि उर्दू चित्रपटांतून कामे केली.

दुर्मीळ छायाचित्रे, वस्तूंचा समावेश

दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहात असंख्य दुर्मीळ छायाचित्रे, हँडबिल्स, गाण्यांच्या पुस्तिका, वृत्तपत्रीय कात्रणे, त्यांच्यावर आलेले लेख, जुनी कागदपत्रे, अनेक पुस्तके, त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली काही नाटके तसेच ते काम करीत असलेल्या हॅम्लेट (१९३३) या नाटकातील काही विग्स, मिशा, आदी वस्तूंचाही समावेश आहे. त्यांच्या संग्रहातील छायाचित्रे प्रामुख्याने कृष्णधवल असून, सुमारे २५० छायाचित्रे दानवे यांनी अभिनय केलेल्या चित्रपट आणि नाटकांमधील आहेत. याशिवाय त्यांच्या समकालीन इतर अभिनेत्यांची ५१ छायाचित्रे आहेत. याशिवाय त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपट आणि नाटकांतील १५ बाय १२ आकाराच्या सुमारे चाळीस मोठ्या फ्रेम्सही आहेत.

कोट

भारतीय चित्रपटसृष्टीतील एका 'युगा'तील एका ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शकाचा दानवे कुटुंबीयांनी मोठ्या परिश्रमाने जतन करून ठेवलेला हा दुर्मीळ संग्रह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाल्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिना आणखी समृद्ध झाला असून, त्याचा संशोधकांना खूप उपयोग होणार आहे.

प्रकाश मगदूम,

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक, पुणे.

कोट

दिग्दर्शक म्हणून तांत्रिकदृष्ट्या तेव्हा अशक्य असलेले अनेक प्रयोग त्यांनी स्टेजवर केले. याची साक्ष म्हणजे कोल्हापूरच्या जीवन कल्याण या संस्थेची अगणित नाटके. दानवे परिवारातर्फे गेली ३३ वर्षे त्यांची स्मृती जतन केली आहे.

- जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

-------------------------------

फोटो : १८0२0२१-कोल-प्रकाश मगदूम

फोटो ओळी : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मीळ ठेवा दानवे यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर येथे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जयश्री दानवे, राजदर्शन दानवे उपस्थित होते.

फोटो : १८0२0२१-कोल- जयप्रकाश दानवे अर्काइव्ह

फोटो ओळी : नटश्रेष्ठ कै. जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मीळ ठेवा.

===Photopath===

180221\18kol_2_18022021_5.jpg~180221\18kol_3_18022021_5.jpg

===Caption===

फोटो : १८0२0२१-कोल-प्रकाश मगदूमफोटो ओळी : नटश्रेष्ठ कै. जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मिळ ठेवा दानवे यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर येथे हा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जयश्री दानवे, राजदर्शन दानवे उपस्थीत होते.~फोटो : १८0२0२१-कोल- जयप्रकाश दानवे अर्काइव्हफोटोओळी : नटश्रेष्ठ कै. जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मिळ ठेवा