शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या रंगकर्मींची आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात झेप, 'आलोरगान' नाटक पोहोचले देशभर 

By संदीप आडनाईक | Updated: January 30, 2023 14:18 IST

या नाटकाला लागत नाही स्टेज, लाईट्स, मोठी जागा

संदीप आडनाईककोल्हापूर : दिल्ली, आसाम, बंगाल आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांतील तब्बल पाच आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात कोल्हापुरातील तरुण रंगकर्मींनी 'आलोरगान' या नाटकाचे सादरीकरण करून कोल्हापूरच्या शिरपेचात नवा तुरा खोवला आहे. या नाटकाने घेतलेली ही झेप प्रशंसनीय आहे. कोल्हापूरची तरुण अभिनेत्री प्रतीक्षा खासनीस आणि दिग्दर्शक कल्पेश समेळ यांनी हे नाटक देशभर पोहोचविले आहे.टायनी टेल्स थिएटर कंपनी निर्मित, कोल्हापुरातील नामांकित सर्जनशाळा, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत 'आलोरगान' हे कोल्हापूरचं नाटक आसाममध्ये पार पडलेल्या 'अंडर द साल ट्री' या प्रतिष्ठित नाट्यमहोत्सवात भारतभरातून आणि बाहेरच्या देशातून निवडल्या गेलेल्या सात नाटकांमध्ये सादर झालं. आसाममधल्या गोलपारा या जिल्ह्यात भरणारा हा नाट्यमहोत्सव 'शुक्राचार्य राभा' यांनी सुरू केला. आपलं जंगल, जमीन, आपल्या इथली झाडं, संस्कृती टिकून राहावी म्हणून चळवळ म्हणून हा नाट्यमहोत्सव सुरू झाला. सालच्या झाडांमधोमध भरणारा हा नाट्यमहोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोकं येतात. गेली १३ वर्षे सातत्याने शुक्राचार्य राभा आणि त्यानंतर मदन राभा हा महोत्सव भरवतात. या नाट्यमहोत्सवात लाईट्स, माईक अशा कोणत्याच गोष्टी वापरल्या जात नाहीत. सगळ्या भोवतालच्या झाडांमध्ये आवाज आदळला जातो आणि पुन्हा ऐकू येतो. सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचतो. त्या जागेत आपलं नाटक सादर होणं ही प्रत्येक कलाकारासाठी खूप अविस्मरणीय गोष्ट असते.देशभरातील विविध नाट्यमहोत्सवात सादर होणाऱ्या 'आलोरगान' नाटकासाठी दहाजणांचा चमू सगळ्यात तरुण मानला गेला आहे. याव्यतिरिक्त बंगालच्या रंगयात्रा आणि दिलीप मुखोपाध्याय स्मृती नाट्यमहोत्सव, दिल्लीतील दिल्ली इंटरनॅशनल आणि महाराष्ट्रातील पुण्यातील नाट्यसत्ताक या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात हे नाटक सादर करण्यात आले. आता साताऱ्यातील फोक थिएटरच्या आर्ट कल्चर या नाट्यमहोत्सवात हे नाटक सादर होणार आहे.

फिरतं नाटक ही संकल्पना प्रत्यक्षात आणत टायनी टेल्स थिएटरने चार वर्षांत शंभरहून अधिक गावांतील लोकांपर्यंत, त्यांच्या जागेत नाटक पोहोचवले आहे. या नाटकाला स्टेज, लाईट्स, मोठी जागा लागत नाही. हॉलमध्ये, घरात, अंगणात, छोट्या जागेत कुठेही हे नाटक सादर केलं गेलं. 'आलोरगान' शिवाय ‘कडेकोट कडेलोट’, ‘राजा आणि चोर’, ‘मंडी’ या नाटकांचेही प्रयोग या रंगकर्मींनी केले आहेत. -कल्पेश समेळ, दिग्दर्शक, आलोरगान. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर