शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांचा आराखडा तयार करा: करवीर प्रांताधिकाऱ्यांच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:03 IST

मतदान केंद्रांवरील सुविधांचा आढावा गेऊन आवश्यक त्या ठिकाणी दिव्यांग मतदारांसाठी रॅँप बनवून घ्या, मतदान केंद्राबाहेर मतदारांना सावलीसाठी मंडप उभारावा, पाण्याचे नियोजन करा, अशा सुचना करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोमवारी केल्या. तसेच प्रत्येकाने आपापल्या मतदान केंद्रांचा आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

ठळक मुद्देमतदान केंद्रांचा आराखडा तयार करा: करवीर प्रांताधिकाऱ्यांच्या सुचनाकोल्हापूर दक्षिण मतदार संघ: क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

कोल्हापूर : मतदान केंद्रांवरील सुविधांचा आढावा गेऊन आवश्यक त्या ठिकाणी दिव्यांग मतदारांसाठी रॅँप बनवून घ्या, मतदान केंद्राबाहेर मतदारांना सावलीसाठी मंडप उभारावा, पाण्याचे नियोजन करा, अशा सुचना करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोमवारी केल्या. तसेच प्रत्येकाने आपापल्या मतदान केंद्रांचा आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील करवीर प्रांताधिकारी कार्यालयात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील क्षेत्रीय अधिकाºयांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होेते. प्रमुख उपस्थिती करवीर तहसिलदार सचिन गिरी होते. तसेच मतदारसंघातील ४१ क्षेत्रीय अधिकारीही उपस्थित होते.प्रांताधिकारी इथापे यांनी मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील सोयी सुविधांचा आढावा घेतला. कोणत्या मतदान केंद्रांवर रॅँप बनविण्याची गरज आहे, कोणत्या केंद्रावर पाण्याची सोय नाही, कोणत्या केंद्रावर उन्हापासून बचावासाठी सावलीकरीता मंडपाची आवश्यकता आहे याची माहिती घेतली. यानंतर आवश्यक त्या ठिकाणी दिव्यांग मतदारांकरीता रॅँप बनवून घ्या, पाण्याची योग्य सुविधा करा, तसेच मतदारांना उन्हाच्या झळा बसू नयेत यासाठी मंडप उभारा अशा सुचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या.त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राचा आराखडा तयार करुन तो सादर करावा. यामध्ये मतदान केंद्रातील खोलीचा नकाशा, मतदान केंद्राअंतर्गत येणारे पुरुष व स्त्री मतदारांचे प्रमाण, मतदान केंद्राचा पुर्र्वाेइतिहास अशी माहिती असावी अशा सुचना प्रांताधिकाऱ्यां नी दिल्या. दरम्यान उपस्थित क्षेत्रिय अधिकाऱ्यां ना ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ मशिन एकत्रित जोडायचे कसे याचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी