शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या, आता नंबर कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:25 IST

transfars, seniorofficers, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांचे शासकीय पातळीवर वजन नाही का? असेही यामध्ये म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा सवाल मंत्र्यांचे शासनदरबारी वजन आहे की नाही? : बदल्या रद्द करा

कोल्हापूर : जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांचे शासकीय पातळीवर वजन नाही का? असेही यामध्ये म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.पत्रकात म्हटले आहे की, महापूर आणि कोरोना संसर्गाच्या संकटत जनतेसाठी अठरा-अठरा तास काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे साक्षात देवदूतच कोल्हापूरला मिळाले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख आणि शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी तर या दीड वर्षात कोल्हापुरातील सर्व काळे धंदे नेस्तनाबूत करून काळे धंदेवाल्यांना मोक्का कायद्याचा हिसका दाखवून समाजाला घातक असणाऱ्या सर्व काळ्या धंद्यांचा बीमोड केला.

इतकेच नव्हे तर खुद्द पोलीस खात्यात असणाऱ्या काही घरभेदी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करून पोलीस खात्याची स्वच्छता केली. या सर्वांची दखल घेऊन राज्य पोलीस खात्याने प्रेरणा कट्टे यांच्या पथकास एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले.त्यांची बदली हा लोकशाहीविरोधातील अवैध काळे धंदेवाल्यांचा विजय मानावा लागेल. ही चर्चा चालू आहे तोवरच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची अचानक तडकाफडकी बदली झाली. त्यांनी कार्यभार स्वीकारून दीड वर्ष झाले नाही तोवर बदली.

राज्य प्रशासनाला कोल्हापूरमध्ये असे लोकाभिमुख, प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी का नको आहेत, हेच समजत नाही, असे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, बाबासाहेब देवकर, माणिक मंडलिक,महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर, अजित सासने, कॉ. चंद्रकांत यादव, आदी यांनी पत्रकात म्हटले आहे.मंत्रिमहोदय गप्प कालोकाभिमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राज्य प्रशासनाने जिल्ह्यातील मंत्र्यांना काही माहिती दिली होती की नाही? जर तुम्हाला या बदल्यांची माहिती होती तर तुम्ही गप्प का राहिलात? असा सवाल कृती समितीने उपस्थित करीत तुमचे वजन वापरून बदल्या रद्द करून त्यांची मुदत आहे तोवर त्यांना कोल्हापुरात कार्यरत ठेवावे अशी मागणी केली.

टॅग्स :Transferबदलीkolhapurकोल्हापूर