शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भरल्या पोटाने वृद्धाश्रमात दरवळला प्रेमाचा सुंगध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:16 IST

कोल्हापूर : व्हॅलेंटाईन डे! आपले प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तरुणाईने व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता व प्रेमी युगुलांपुरताच मर्यादित न ठेवता सामाजिक बांधीलकी जोपासत हा ‘प्रेम दिवस’ साजरा केला आहे. भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी व पैलवान प्रतिष्ठानतर्फे ‘व्हॅलेंटाईन डे’ आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना गुलाबाची ...

कोल्हापूर : व्हॅलेंटाईन डे! आपले प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तरुणाईने व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता व प्रेमी युगुलांपुरताच मर्यादित न ठेवता सामाजिक बांधीलकी जोपासत हा ‘प्रेम दिवस’ साजरा केला आहे. भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी व पैलवान प्रतिष्ठानतर्फे ‘व्हॅलेंटाईन डे’ आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना गुलाबाची फुले देत व त्यांना पंगतीच्या जेवणाची मेजवानी देत हा दिवस साजरा केला.आजकाल प्रत्येकजण पैशामागे धावत आहे. स्वत:च्या मुलांनी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला असताना, या वृद्धाश्रमातील वृद्धांशी त्यांचे कोणतेही ऋणानुबंध नसताना, भाजपा क्रीडा जिल्हाध्यक्ष व पैलवान प्रतिष्ठानचे संस्थापक महेश मोरे यांनी सामाजिक बांधीलकी जपत या वृद्धांसोबत वृद्धाश्रमात व्हॅलेंटाईन डे साजरा केला. प्रेम ही कधीच न बदलणारी संकल्पना असून, ती नेहमीच एका नव्या रूपात आपल्यासमोर येत असते. प्रेमाच्या बेधुंद लहरीत रंगणाºया प्रेमी युगुलांसाठी तर प्रत्येक दिवस नव्याने प्रेमात पाडणारा असतो. मात्र, पोटच्या पोरांचेच आपल्या आई-वडिलांवरील प्रेम आटत चालल्याने त्यांनी या वृद्धांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला. आमच्या नशिबात कुठले आलेय प्रेम अशी सल येथील वृद्धांच्या मनात असते. हेच दु:ख कमी करण्यासाठी व सामाजिक बांधीलकी जपत भाजपाचे कार्यकर्ते व पैलवान प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.येथील वृद्धांना गुलाबाची फुले वाटत, त्यांना पंगतीच्या जेवणाची मेजवानी देत, पदाधिकाºयांनी त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पाही मारल्या. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे येथील वृद्ध भारावून गेले. त्यांच्या या सामाजिक बांधीलकीमुळे काही काळ येथील वृद्धांचे दु:ख हलके झाले. या उपक्रमात सचिन भोगम, रमेश हंकारे, संग्राम जाधव, राहुल वाले, सौरभ पाटील, सोन्या मोरे, मुरली पोळ, अक्षय कांबळे, चिनू वाले, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.