शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

‘गडहिंग्लज’मधून परिवर्तनाची नांदी

By admin | Updated: September 12, 2016 01:10 IST

चंद्रकांतदादा पाटील : शहापूरकर-चव्हाणांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

गडहिंग्लज : चंदगड, आजरा, पेठवडगाव व कुरुंदवाडनंतर अनेकजण प्रवेशाच्या रांगेत आहेत. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाणांचा आनंददायी प्रवेश जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण देणारा आहे. किंबहुना, जिल्ह्यातील आगामी परिवर्तनाची नांदी गडहिंग्लजमधून झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गडहिंग्लज कारखान्याचे माजी अध्यक्ष शहापूरकर व माजी उपाध्यक्ष चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे स्कार्प व कमळपुष्प देऊन त्यांचा शहापूरकर व चव्हाणांसह त्यांच्या समर्थकांचे स्वागत करण्यात आले. चंद्रकांतदादा म्हणाले, महानगरपालिका व जिल्हा परिषदेत आपली सत्ता नसल्यामुळे विकासकामे करताना अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत सत्ता आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामाला लागा. आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, भुदरगड व गडहिंग्लज भागातील जनतेचे दारिद्र्य व दु:ख संपवायला आम्ही भूमिपुत्र वचनबद्ध आहोत. उद्योजकांची परिषद घेऊन गडहिंग्लज व चंदगडच्या एमआयडीसीला चालना देण्याबरोबर रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले जातील. शहापूरकर म्हणाले, राष्ट्रवादीमुळे गडहिंग्लजची ससेहोलपट झाली असून, भ्रष्टाचारामुळे तालुका रसातळाला गेला आहे. राष्ट्रीय पेयजल योजनांच्या तालुक्यातील कामांची चौकशी करण्याबरोबरच उचंगी व आंबेओहोळ प्रकल्प, आजरा-आंबोली रस्ता, तालुका क्रीडासंकुल व गडहिंग्लज शहरातील नाट्यगृहाचा प्रश्न पालकमंत्र्यांनी मार्गी लावावा. चव्हाण म्हणाले, पाच वर्षांत गडहिंग्लज कारखान्याची सत्ता पुन्हा ताब्यात घेऊ आणि आगामी निवडणुकीत विश्वासघातकी मंडळींना जागा दाखवू. विकासासाठी गडहिंग्लज विभाग पालकमंत्र्यांनी दत्तक घ्यावा. जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, गोपाळराव पाटील, अनिता पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. बेळगावचे आमदार संजय पाटील, बाबूराव कुंभार, अ‍ॅड. विकास पाटील, रमेश रिंगणे, उदय चव्हाण, मारुती राक्षे, अनिल खोत, मार्तंड जरळी, विजय मगदूम, प्रेमा विटेकरी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. एल. टी. नवलाज यांनी स्वागत केले. हेमंत कोलेकर यांनी प्रास्ताविक केले. सुभाष कोरी यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले. यांचाही भाजपमध्ये प्रवेश गडहिंग्लज साखर कारखान्याचे विद्यमान संचालक किरण पाटील, सुभाष शिंदे व अनंत कुलकर्णी. माजी संचालक सुभाष शिरकोळे, बचाराम मोहिते, चंद्रकांत जांगनुरे, आण्णाप्पा मणीकेरी, चंद्रकांत कांबळे, बाबूराव मदकरी, आबासाहेब देसाई, रमेश आरबोळे व अ‍ॅड. सुभाष शिंदे, माजी सभापती आप्पासाहेब पाटील, नागाप्पा हत्ती, गडहिंग्लज बाजार समितीचे उपसभापती रवींद्र शेंडुरे, जि. प. माजी सदस्य गणपतराव डोंगरे, मल्लिकार्जुन बेल्लद, युवराज बरगे, विद्या गोसावी, संतोष चिक्कोडे, सतीश हळदकर यांच्यासह गडहिंग्लज शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंत यमगेकर यांचे सुपुत्र तुषार यमगेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. (प्रतिनिधी)