कोल्हापूर : मराठा आरक्षण मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणून कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्रिपदावर चढण्याची घाई लागली असल्याची टीका संभाजी ब्रिगेडचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली.आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांनी सहभाग नोंदविला, त्याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देणे योग्य नाही सामाजिक मागासलेपणावर आरक्षण द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.गायकवाड म्हणाले, महाराष्टÑात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा मावळ्यांनाच आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव चालू देणार नाही. मराठा आरक्षण समितीचे जोपर्यंत चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष आहेत, तोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळणार नाही.मराठा जात नव्हे, समूह आहेमराठा ही जात नव्हे, तो समूह आहे. मराठ्यांची खरी जात ही कुणबी आहे. त्या जातीला आरक्षणाच्या माध्यमातून संरक्षण मिळालेच पाहिजे, असे सांगून गायकवाड म्हणाले, आतापर्यंत घटनेत १२३ वेळा बदल केले आहेत; त्यामुळे आणखी बदल करणे अवघड नाही. मनात आणले तर घटनात्मक कायदेशीर आरक्षण मिळू शकते.१० हजारांवरीलगुन्हे मागे घ्यामराठा आरक्षणाबाबत आंदोलनात९ आॅगस्टच्या ‘महाराष्ट्र बंद’वेळी कोणतीही हिंसा नको, शांततेत बंद करा, असे आवाहन करण्यासाठी महाराष्टÑभर दौरे सुरू असून, राज्यात १० हजार युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशीही मागणी पत्रकार परिषदेत केली.
चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्रिपदाची घाई:प्रवीण गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:38 IST