शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

शिक्षक संघाला सत्तेचा ‘प्रसाद’ कडूच !

By admin | Updated: April 6, 2015 01:14 IST

वरुटेंचा पराभव जिव्हारी : आत्मविश्वास नडल्याने ‘परिवर्तन’ला अपयश; ‘समविचारी’तच नेतृत्वाचा वाद

$$्निराजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर प्राथमिक शिक्षक बॅँकेत सत्ता अबाधित राखण्यात राजाराम वरुटे यांना यश आले असले तरी शिक्षक संघ व करवीर तालुक्यातील अंतर्गत राजकारण थोपविण्यात त्यांना यश आले नाही. पॅनेल बांधणीत गणिते चुकूनही सुरुवातीपासून निर्माण केलेली हवा मतपेटीपर्यंत पोहोचविण्यात विरोधकांचा आत्मविश्वास नडल्यानेच त्यांना सत्तेपासून लांब राहावे लागले. निकाल पाहता, तो राजाराम वरुटेंना आत्मचिंतन करून पुढील बांधणी करायला लावणारा, तर विरोधकांची चिंता वाढविणारा ठरला आहे. बॅँकेसाठी पॅनेल जाहीर केल्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे निवडणुकीत शेवटपर्यंत रंगत राहिली. शिक्षक समिती-पुरोगामीच्या आघाडीत बराच वेळ गेला. त्यातच उमेदवारी निवडीत एकमत न झाल्याने राधानगरी, शाहूवाडी, चंदगड व पन्हाळामध्ये या पॅनेलला मोठा फटका बसला. समितीचे राज्य उपाध्यक्ष जोतिराम पाटील यांची बंडखोरी, जुन्या चेहऱ्यांना दिलेली संधी व ‘कास्ट्राईब’ला डावलल्याने त्याची किंमत मोजावी लागली. प्रसाद पाटील व कृष्णात कारंडे यांनी सत्तारूढ गटावर जोरदार हल्ला चढवीत चांगली हवा तयार केली; पण गेल्या निवडणुकीतील आकडेवारी या नेत्यांच्या डोक्यात राहिल्याने त्यांचे या निवडणुकीतील सत्तेचे गणित चुकले. त्यातच ‘पुरोगामी’चे रवी शेंडे व मनोजकुमार रणदिवे यांची बंडखोरी फारच महागात पडली. सत्तारूढ गटाचे नेते राजाराम वरुटे यांनी पॅनेल बांधणीत कमालीचा चाणाक्षपणा दाखविला. शिरोळमध्ये रवी पाटील यांचे बंड थोपविण्यात वरुटेंना अपयश आले. त्याचा फटका शिरोळमध्ये बसला. करवीरमध्ये त्यांना अपेक्षित पाठबळ मिळाले नाही; पण इतर चंदगड, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांनी साथ दिल्याने विजयापर्यंत पोहोचू शकले. ‘समविचारी’ पॅनेलमध्ये सुरुवातीपासून गोंधळ सुरू होता. नेतृत्व कोणी करायचे, हा प्रश्न सुटेपर्यंत बॅँकेची निवडणूक कधी संपली हे त्यांनाच कळले नाही. बॅँकेच्या २००९ पूर्वीच्या कारभार केलेल्या मंडळींनी प्रचाराची सूत्रे हातात घेतल्याने पराभव झाल्याची चर्चा संघाच्या कार्यकर्त्यांत आहे. समितीचे जोतिराम पाटील, संघाचे रघुनाथ खोत व रवी पाटील यांचे पाठबळ मिळाल्याने अनपेक्षितपणे पॅनेलची ताकद वाढल्याने नेत्यांचा आत्मविश्वास वाढला; पण सभासदांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.