शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
2
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
3
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
4
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
5
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
6
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
7
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
8
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
9
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
10
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
11
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
12
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
13
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
15
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
16
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
17
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
18
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
19
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
20
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

‘करसहाय्यक’मध्ये राज्यात प्रल्हाद राठोड पाचवा

By admin | Updated: March 9, 2017 19:01 IST

अश्विनी चव्हाण नववी; ‘एमपीएससी’कडून निकाल जाहीर

‘करसहाय्यक’मध्ये राज्यात प्रल्हाद राठोड पाचवा

अश्विनी चव्हाण नववी; ‘एमपीएससी’कडून निकाल जाहीरकोल्हापूर : करसहाय्यक पदाच्या परीक्षेत कोल्हापुरातील प्रल्हाद धनसिंग राठोड याने राज्यात पाचवा, तर अश्विनी अशोक चव्हाण हिने नववा क्रमांक मिळविला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सन २०१६ मध्ये घेतलेल्या या परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी आॅनलाईन जाहीर केला.करसहाय्यक पदाच्या ४५० जागांसाठी एमपीएससीने परीक्षा घेतली होती. या परीक्षेत पाचव्या क्रमांकाने यशस्वी झालेला प्रल्हाद राठोड हा मूळचा कोल्हापूरचा असून तो टिंबर मार्केट येथे राहतो. बी. कॉम. पदवीधर असलेल्या प्रल्हादने दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. यात गेल्यावर्षी तो एमपीएससीच्या लेखनिक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. यावर्षी १८८ गुणांसह त्याने करसहाय्यक परीक्षेत यश मिळविले आहे. राज्यात मुलींमध्ये नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली अश्विनी चव्हाण ही शिवाजीपेठेत राहते. तिला १७८ गुण मिळाले आहेत. बी. कॉम. पदवी मिळविलेल्या अश्विनीने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. तळगांव (ता. राधानगरी)मधील स्नेहल पाटील हिने १७२ गुणांसह तेरावा क्रमांक मिळविला. इचलकरंजीतील गंगानगरमधील सुशांत कराळे हा २०८ गुणांसह यशस्वी ठरला आहे. त्याचा राज्याच्या गुणवत्ता यादीत २९ वा क्रमांक आहे. हे यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनी कोल्हापुरातील अरुण नरके फौंडेशनच्या आहेत. त्यांचा गुरुवारी फौंडेशनचे संस्थापक अरुण नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष बाळ पाटणकर, प्राचार्या शिल्पा देवगांवकर, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)..............................................................................प्रतिक्रियादोन वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अभ्यासातील सातत्य आणि अरुण नरके फौंडेशनमधील शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर यशस्वी ठरलो. एमपीएससीच्या वर्ग दोनचे पद मिळविण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार आहे. माझ्या यशात आई-वडील, शिक्षकांचे पाठबळ महत्त्वाचे आहे.- प्रल्हाद राठोड......................................................................या पदाच्या परीक्षेत पहिल्या वर्षी अपयशी ठरले. गेल्या वर्षी चार गुणांनी यशाने हुलकावणी दिली. त्यावर जिद्दीने अभ्यास करीत यावर्षी यशस्वी ठरले. यासाठी दिवसातील दहा तास अभ्यास करीत होते. विक्रीकर निरीक्षक होण्याचे ध्येय असून त्यादृष्टीने यापुढे तयारी करणार आहे.-अश्विनी चव्हाण