शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
3
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
4
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
5
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
6
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
7
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
8
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
9
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
10
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
11
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
12
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
14
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
15
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
16
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
17
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
18
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
19
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
20
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...

प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब कुंभार पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार) निवडणुकीत ‘देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विकास आघाडी’चे नेते माजी महापौर प्रल्हाद चव्हाण व बाळासाहेब कुंभार यांना पराभवाची चव चाखावी लागली. आघाडीचे दुसरे नेते व माजी उपमहापौर उदय पोवार, प्रकाशराव बोंद्रे यांनी बझारवर पुन्हा वर्चस्व राखले आहे. पोवार ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार) निवडणुकीत ‘देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विकास आघाडी’चे नेते माजी महापौर प्रल्हाद चव्हाण व बाळासाहेब कुंभार यांना पराभवाची चव चाखावी लागली. आघाडीचे दुसरे नेते व माजी उपमहापौर उदय पोवार, प्रकाशराव बोंद्रे यांनी बझारवर पुन्हा वर्चस्व राखले आहे. पोवार यांची खेळी यशस्वी झाल्याने चार अपक्षांनी बाजी मारली.जनता बझारची निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत राहिली. पात्र-अपात्र नाट्यानंतर पॅनेल बांधणीतील बेबनावामुळे तर मतदानापर्यंत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. उदय पोवार, प्रकाशराव बोंद्रे व प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब कुंभार यांनी स्वतंत्र पॅनेल बांधणी केली होती. माघारीनंतर ऐनवेळी पोवार, बोंद्रे, चव्हाण व कुंभार यांनी एकत्रित येत ‘कुंभार विकास आघाडी’ची घोषणा केली. आघाडी बांधली; पण प्रचारात कोठेही एकसंधपणा दिसला नाही.रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून देशभूषण हायस्कूल येथे सहा केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सर्वसाधारण गटात २,२७९ पैकी केवळ ८४३ मतदान (३६.९८ टक्के) झाले. ‘क’ वर्ग गटात १६ पैकी १५, ‘ब’, ‘ड’ व ‘ई’ गटांत १३ मते झाली. दुपारी साडेचारनंतर मतमोजणीस सुरुवात झाली. यामध्ये सर्वसाधारण गटात प्रल्हाद चव्हाण व बाळासाहेब कुंभार या दोन कुंभार आघाडीच्या नेत्यांना, तर मधुकर चित्रूक यांना पराभव पत्करावा लागला. या गटात बिपेन जाजू, आकाराम पाटील व वैभव पोवार विजयी झाले.निवडणूक निर्णय अधिकारी टी. बी. बल्लाळ, मिलिंद ओतारी, नितीन माने, सचिन कामिरे, उदय उलपे यांनी निवडणुकीचे काम पाहिले.गटनिहाय विजयी उमेदवार असे, कंसात मतेसर्वसाधारण : उदयकुमार देसाई (५७५), शिवाजी घाटगे (५६२), दीपक शिराळे (५६०), अरुण साळुंखे (५४४), उदय भोपळे (५३८), वैभव पोवार (३८४), आकाराम पाटील (३६२), बिपेन जाजू (३३५).‘ब’ वर्ग - प्रकाशराव बोंद्रे (१३).‘क’ वर्ग - रमेश उलपे (८).‘ड’, ‘ई’- उदय पोवार (९), सुहास बोंद्रे (९), तृप्ती शिंदे (८), मधुकर शिंदे (८).महिला - विद्या माळी (५७९), ललिता माळी (५७१).इतर मागासवर्गीय - मदन चोडणकर (५९८).भटक्या विमुक्त जाती - तानाजी साजणीकर (६२७).अनुसूचित जाती - रविकिरण चौगुले (६३८).पती-पत्नी, पिता-पुत्र सभागृहातउदय पोवार यांचे सुपुत्र वैभव सर्वसाधारण गटातून अपक्ष म्हणून निवडून आले, तर ‘ड’, ‘ई’ गटातून मधुकर शिंदे व तृप्ती शिंदे हे पती-पत्नी विजयी झाले. तसेच प्रकाशराव बोंद्रे ‘ब’ गटातून, तर त्यांचे सुपुत्र सुहास ‘ड’, ‘ई’ गटातून विजयी झाले.भूमिका नडली!प्रल्हाद चव्हाण व त्यांचे सुपुत्र सचिन चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आघाडीत नाराजी होती. त्याचा राग मतांद्वारे व्यक्त केल्याची चर्चा होती.निकराची झुंज‘क’ वर्ग गटात केवळ १५ मते होती. आघाडीचे प्रकाश खुडे व अपक्ष रमेश उलपे यांच्यात निकराची झुंज झाली. एका मताने उलपे विजयी झाले.