शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसपाटील, कोतवाल यांना लवकरच मानधनवाढ : प्रकाश आबिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:08 IST

कोल्हापूर : राज्यातील पोलीस पाटील, कोतवाल आणि आशा स्वयंसेविका यांची लवकरच मानधनवाढ होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. याबाबतचा ‘एकछत्री समिती’चा अहवाल महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आबिटकर यांनी त्यांची भेट घेतली.आबिटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील पोलीसपाटील, कोतवाल आणि आशा स्वयंसेविका यांचे ...

ठळक मुद्देआशा स्वयंसेविकांचाही समावेश; मंत्री राठोड यांची घेतली भेट

कोल्हापूर : राज्यातील पोलीस पाटील, कोतवाल आणि आशा स्वयंसेविका यांची लवकरच मानधनवाढ होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. याबाबतचा ‘एकछत्री समिती’चा अहवाल महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आबिटकर यांनी त्यांची भेट घेतली.

आबिटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील पोलीसपाटील, कोतवाल आणि आशा स्वयंसेविका यांचे मानधन वाढवावे ही मागणी घेऊन गेल्या दोन वर्षांपासून मी शासन स्तरावर प्रयत्न करीत आहे. स्थानिक स्तरावरचे तंटे मिटविण्याचे महत्त्वाचे काम पोलीसपाटील करतात, परंतु त्यांचे मानधन नाममात्र आहे. ३१ जुलै २०१७ रोजी आझाद मैदानात पोलीस पाटील बंधूंनी आंदोलन केले. त्याहीवेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी आंदोलकांची भेट घालून देऊन चर्चा केली.

याबाबत निर्णय न झाल्याने मानधनवाढीकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली. यावेळी उत्तरामध्ये गृहराज्यमंत्री केसरकर यांनी शासन मानधनवाढ करण्यास कटिबद्ध असून, लवकरच समिती स्थापन करीत असल्याचे सांगितले.

यानुसार पोलीसपाटील, कोतवाल व आशा स्वयंसेविका यांची मानधनवाढ व विविध मागण्यांकरिता एकछत्री समितीची स्थापना केली. या समितीने आपला स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर केला. हा अहवाल मुख्य सचिव डी. के. जैन, महसूलचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे पाठविला आहे.यावेळी पोलीसपाटील संघटनेचे राज्य सचिव कमलाकर मांगले, योगेश पाटील-भिवंडी, रवींद्र पवार, धनाजी खोत, अवधूत परुळेकर उपस्थित होते.प्रस्तावावर स्वाक्षरी२० जूनला आपण मंत्री राठोड यांची भेट घेतली असून त्यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यामुळे लवकरच या तीनही घटकांची मानधनवाढ होणार असल्याचे आमदार आबिटकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.