गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील प्रदीप पोवार यांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली. पदोन्नतीवर त्यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली आहे.
पोवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून २००९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. त्यांनी चार वर्षे नागपूर शहरात काम पाहिले. २०१३ मध्ये त्यांची सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नतीवर औरंगाबाद परिक्षेत्रात बदली झाली. २०१८ पर्यंत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात काम केले. सध्या जालना जिल्ह्यात ते कार्यरत आहेत.
* प्रदीप पोवार : २४०२२०२१-गड-०१
---------------------------
२) ‘कडाल’ची चाळोबा यात्रा रद्द
गडहिंग्लज : कडाल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत श्री चाळोबा देवाची २ व ३ मार्च रोजी होणारी यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी दिली.