शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
5
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
6
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
7
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
8
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
9
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
10
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
11
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
12
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
13
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
14
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
15
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
16
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
17
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
18
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
19
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला

अभ्यास दौरा

By admin | Updated: January 12, 2017 22:05 IST

फुल्ल बाजा

आमचा रिक्षाचा धंदा माझा लै आवडीचा. आमच्या रंगादादानं (आमच्या पेठेतला पलीकडल्या गल्लीतला माझा दोस्त) स्वत्ता रिक्षा काढता काढता मलाबी शिकवली आनि पैली रिक्षा घ्यून देन्यात मदत बी केली. रिक्षाच्या मडफ्ल्याप वरल्या झ्यांगप्यांग डिझाईन पास्नं ते मागल्या काचंवरल्या (डोक्याला ताण दिल्यावरच समजनाऱ्या) म्याटर पात्तूर आपलं बारीक लक्ष आसतंय, त्यामुळं चौकातल्या स्टॉप पास्नं आख्ख्या शिटीत बाजाची रिक्षा पेशल वळखली जातीया.परवा नागाळा पार्कात झेडपी आॅफिस जवळच्या स्टॉपवर रिक्षा लावून गिऱ्हाईकाची वाट बगत हुतो. लै वेळ हुबारून कंटाळा आला म्हनून म्हनलं जरा आत जाऊन आॅफिसचा अभ्यासदौरा करून यू... तर आत लै धांदल चाल्ल्याली! हे... सगळ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात बरीच गावाकडली नेतेमंडळी लगबगीत दिसत हुतीत. आता पांढरा भटटीचा कडक शर्ट (आनि तेच्यापेक्षा कडक एक्स्प्रेशन) सगळीच पोष्टरबॉईज घालत्यात, त्यामुळं कार्यकर्ता कोंचा आनि सायेब कोंचे हे वळकायला हल्ली जरा अवघडच जातंय... पण साधारणपणे गराड्याच्या शेंटरला सायेब असत्यात हे जजमेंट आता आपल्याला आलंय. ह्या सभागृहाची टर्म सपत आल्यानं एकून्णच आॅफिसच्या आवारात कामं उरकन्यासाठी चाल्ल्याली घाई आनि धावपळ बगून मन भरून आलं. तेवढ्यात एका सायबांच्या साईडरचा चेहरा वळकीचा वाटला म्हणून निरखून बगितलं तर त्यो आमच्या आत्तीच्या दाजींचा पावना निगाला. सायेबांनी हातातलं कागद आनि सोत्ताच्या चेहऱ्यावरलं बेरिंग पावन्याच्या ताब्यात दिलं आनि सायेब दारातनं सभागृहात शिरलं. फुडं हून मी पावन्याला वळख सांगितली आनि तेच्या कडक हुब्या एक्स्प्रेशनला आडवी रेघ पाडली. ‘भागात कामांचा दनका दिसतोय?’ मी अंदाज घेत ईचारलं. ‘कामं काय, रोज्ची हाइतच की..!’ पावना. ‘त्ये न्हवं, आज सगळीच लै धांदलीत दिसत्यात.. ईषेश काय हाय काय?’ मी.‘अभ्यासदौऱ्याचं नियोजन.’ पावना.‘कसला अभ्यास? आनि दौरा कुनिकडं?’ माज्या या प्रश्नावर मी कंप्लीट अडानी असल्याचं सिद्ध करनारा लूक माझ्याकडं टाकत पावन्यातला सायडर म्हनला, ’ आरं जगात जिथं म्हनून भारी काम चाल्ल्यात तेंचं निरीक्षण करन्यासाठी दौरा काडायचा आनि आपल्या मतदारसंघात तशा टाईपनं काम हुतील हेचा अभ्यास करायचा यासाठी सायबास्नी बजेट दिल्यालं असतंय. तेचं नियोजन करन्यासाठी समदी घाई चाल्लीया.’’आसं व्हय...! खरं निवडून आल्या आल्या एक दोन वर्षात ह्यो अभ्यासदौरा आखला तर चालत न्हाई व्हय? म्हंजे केल्या अभ्यासाचं चीज करून इकासकामं करून दाखवायला नीट टाईम तर मिळतोय. आता फुडली इलेक्शन बी लागली. कवा दौरा आखनार? कवा अभ्यास करनार? आनि कवा इकासकामं करनार?’ माज्या या सरबत्तीवर इरोधकावर टाकावा तसा तुच्छ कटाक्ष टाकून पावना गुरगुरला, ‘बाज्या लेका कवातर माझ्याबरूबर राहून बग, मग कळल तुला भागातली इकासकार्य म्हंजे कसला कामांचा डोंगर असतो ते! सकाळी उठल्यापास्रं लोकं पोरग्याला नोकरीला लावा पास्नं बांधावरली भांडनं मिटवून द्या पात्तूर काय वाट्टेल ती कामं घ्यून येत्यात. तेच्यातनं भागातलं रस्तं, वीज, पानी, गटरी हेच्याकडं लक्ष द्याचं तर जेवायला टाइम मिळत न्हाई एकेकदा. तेच्यात इरोधकांची झोंबडी लै असत्यात. आता हेच बग की जरा सभागृहाच्या शेवटी शेवटी अभ्यासदौरा काडून कुटं फिरायला जावं म्हटलं तर हित्तंबी इरोधक हाईतच...त्येबी आमच्यातलंच. सायबांसारखं निवडून आल्यालंच.’ म्हटलं, ‘बरुबर हाय तुजं. हूंदे अभ्यासदौरा. शक्य आसंल तर फॉरेनलाच काडा. पुना असा चान्स घावल का न्हाई सांगता याचं न्हाई. खरं तुमचं सायेब या टायमाला इलेक्शन कोंच्या पक्षाकंडं लढवनार हाईत?’ तर म्हनला, ’ भुंगा चिन्ह घ्यून अपक्ष उभारन्याच्या नादात हाईत सायेब. अंदाज घ्यून कमळाकडं बी जाता येतंय.. न्हाईतर वाऱ्यासंगट बी फिरता येतंय.’-- भरत दैनी