शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

प्रॅक्टिस, पाटाकडील(अ) ची आगेकूच महापौर चषक फुटबॉल स्पर्धा : अनुक्रमे संयुक्त जुना बुधवार, मंगळवार पेठ पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:42 IST

कोल्हापूर : कैलास पाटील, राहुल पाटील, इंद्रजित चौगुले व सिद्धार्थ पाटील यांच्या उत्कृष्ट खेळीवर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)ने संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ फुटबॉल संघाचा ४-० ने, तर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने नवख्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा ४-१ असा पराभव करीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील आपली घोडदौड कायम ...

कोल्हापूर : कैलास पाटील, राहुल पाटील, इंद्रजित चौगुले व सिद्धार्थ पाटील यांच्या उत्कृष्ट खेळीवर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)ने संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ फुटबॉल संघाचा ४-० ने, तर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने नवख्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा ४-१ असा पराभव करीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील आपली घोडदौड कायम ठेवली.शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी पहिल्या सत्रात पाटाकडील (अ) व मंगळवार पेठ फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘पाटाकडील’ संघाचेच वर्चस्व राहिले. यात ‘पाटाकडील’कडून वेगवान व खोल चढाया करण्यात आल्या. १० व्या मिनिटास ‘पाटाकडील’कडून ओंकार वैभव जाधवने पहिल्या गोलची नोंद करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर सामन्यात बरोबरी साधण्यासाठी ‘मंगळवार पेठ’कडून सोमनाथ निमक, सागर पठाडे, नीलेश खापरे, सचिन पाडळकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, भक्कम बचाव फळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. ३४ व्या मिनिटास ‘पाटाकडील’कडून रूपेश सुर्वे याने गोल करीत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. उत्तरार्धात मंगळवार पेठ संघानेही आक्रमक, वेगवान चाली रचल्या. ५४ व्या मिनिटास मिळालेल्या संधीवर मंगळवार पेठकडून नितीन पोवारने गोल करीत २-१ ने आघाडी कमी केली. यानंतर पुन्हा ६२ व्या मिनिटास रूपेश सुर्वेने संघाचा तिसरा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत ही आघाडी ३-१ ने भक्कम केली. उत्तरोत्तर खेळावर ‘पाटाकडील’चे वर्चस्व राहिले. ६५ व्या मिनिटाला ‘पाटाकडील’कडून सार्थक राऊतने गोल नोंदवत ही आघाडी ४-१ अशी केली. हीच गोलसंख्या कायम ठेवत ‘पाटाकडील (अ)’ने सामना जिंकला.दुपारच्या सत्रात दुसरा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब व संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ फुटबॉल संघ यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांकडून वेगवान खेळाचे प्रदर्शन करण्यात आले. ‘प्रॅक्टिस’कडून १५ व्या मिनिटाला कैलास पाटीलने इंद्रजित चौगुलेच्या पासवर गोल नोंदवित संघास पहिली आघाडी मिळवून दिली. त्यानंतर राहुल पाटीलच्या पासवर पुन्हा कैलासने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फटका गोलपोस्टवरून गेला. ‘जुना बुधवार’कडून नीलेश सावेकर, कौशिक जाधव यांचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना यश आले नाही. उत्तरार्धात ४५ व्या मिनिटास जुना बुधवारचा गोलरक्षक अभिषेक कदम पुढे आल्याची संधी साधत राहुल पाटीलने गोल केला. त्यामुळे ‘प्रॅक्टिस’कडे २-० अशी भक्कम आघाडी आली. त्यानंतर६२ व्या मिनिटाला इंद्रजित चौगुलेने राहुल पाटीलच्या पासवर गोल करीत प्रॅक्टिस संघास ३-० अशी आघाडी मिळवून दिली. संयुक्त ‘जुना बुधवार’कडून प्रसाद पाटीलने मारलेला फटका प्रॅक्टिसचा गोलरक्षक राजीव मिरयालने डावीकडे झेपावत बाहेर काढला. त्यामुळे संयुक्त जुना बुधवारची आघाडी कमी करण्याची संधी वाया गेली. ७७ व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या सिद्धार्थ पाटीलने गोल करीत ४-० अशी आघाडी भक्कम केली. तीच कायम ठेवतसामनाही ‘प्रॅक्टिस’ने सहज खिशात घातला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल