शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

प्रॅक्टिस ‘अ’ची ‘शिवाजी’वर मात अटल चषक फुटबॉल : टायब्रेकरवर निर्णय, सामन्यात शेवटपर्यंत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:17 AM

कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने शिवाजी तरुण मंडळाचा ३-२ असा टायब्रेकरवर पराभव करीत साखळी फेरीत प्रवेश केला. ‘प्रॅक्टिस’च्या माणिक पाटीलने ‘सामनावीरा’चा बहुमान पटकाविला.

कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने शिवाजी तरुण मंडळाचा ३-२ असा टायब्रेकरवर पराभव करीत साखळी फेरीत प्रवेश केला. ‘प्रॅक्टिस’च्या माणिक पाटीलने ‘सामनावीरा’चा बहुमान पटकाविला.शाहू स्टेडियमवर नेताजी तरुण मंडळ व ‘केएसडीए’तर्फे सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी प्रॅक्टिस क्लब ‘अ’ व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘प्रॅक्टिस’चे वर्चस्व राहिले. ‘पॅ्रक्टिस’च्यामाणिक पाटीलच्या पासवर कैलास पाटीलची गोल करण्याची नामी संधी हुकली.त्यानंतर ‘प्रॅक्टिस’च्याच इंद्रजित चौगुलेने दिलेल्या पासवर सागर चिलेने हेडद्वारे मारलेला फटकाही ‘शिवाजी’चा गोलरक्षक आकाश मेस्त्रीने परतावून लावला. ‘प्रॅक्टिस’कडून राहुल पाटील, फॅनियन, सागर चिले यांच्याकडूनगोल करण्याचे अनेक प्रयत्नझाले. मात्र, त्यांना ‘शिवाजी’चा गोलरक्षक आकाश अडसर ठरत होता. त्याने ‘प्रॅक्टिस’च्या गोल करण्याच्या अनेक संधी कधी डावीकडे झेपावत, तर कधी हाताने पंच करीत बाहेर काढल्या.उत्तरार्धात दोन्ही संघांनी गोल करून आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात पाऊल ठेवले. मात्र, यात ‘प्रॅक्टिस’कडून राहुल पाटील, इंद्रजित चौगुले, कैलास पाटील, सागर चिले यांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, ‘शिवाजी’च्या सजग गोलरक्षकापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. ‘शिवाजी’कडून सुमितजाधव, योगेश धामोणे, प्रदीप पाटील, अक्षय सरनाईक, आकाश भोसले यांनी गोल करून आघाडी घेण्याचा प्रयत्न केला.मात्र, ‘प्रॅक्टिस’च्या बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. उत्तरार्धाच्या शेवटपर्यंत ‘प्रॅक्टिस’कडून सातत्याने चढाया झाल्या; पण त्यांना गोल करण्यात अखेरपर्यंत यश आले नाही. संपूर्ण वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने मुख्य पंच राजू राऊत यांनी टायब्रेकरचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार झालेल्या टायब्रेकरवर प्रॅक्टिस क्लबने ३-२ अशा गोलफरकाने शिवाजी तरुण मंडळवर मात करीत स्पर्धेची पुढील फेरी गाठली.हाणामारीचेग्रहण सुटेनासामन्यादरम्यान फुटबॉल समर्थकांकडून टेंबे रोडच्या कोपऱ्यातील गॅलरीतून मैदानात पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. त्यानंतर सामन्याच्या अखेरीस याच गॅलरीत काही समर्थकांत जुंपली. ही हाणामारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर व त्यांच्या सहकाºयांनी प्रेक्षक गॅलरीत प्रवेश करीत हुल्लडबाजांना लाठीचा प्रसाद दिल्यानंतर थांबली. सामन्यानंतर मैदानाबाहेरही समर्थकांत जुंपण्याची शक्यता गृहीत धरून तेथेही बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रत्येक स्पर्धेवेळी काही हुल्लडबाज प्रेक्षक हाणामारी व गोंधळ घालतात. अशा हुल्लडबाजांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी खºया फुटबॉलप्रेमींकडून होत आहे.दोन्हीहीसंघांकडून दर्जेदारखेळाचे दर्शन‘शिवाजी’कडून प्रदीप पाटील, नितांत कोराणे यांनी गोल केले, तर सुमित जाधव, योगेश धामोणे, अक्षय सरनाईक यांचे फटके बाहेर गेले.‘प्रॅक्टिस’कडून प्रतीक बदामे, कैलास पाटील, माणिक पाटील यांनी गोल केले; तर राहुल पाटील, फॅनियन यांचे फटके वाया गेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल