शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रॅक्टिस ‘अ’कडून दिलबहार ‘अ’ पराभूत : अटल चषक फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:37 IST

कोल्हापूर : डेव्हिड ओपेरा, श्रेयस मोरे, राहुल पाटील यांच्या गोलच्या जोरावर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने तुल्यबळ दिलबहार तालीम मंडळ ...

कोल्हापूर : डेव्हिड ओपेरा, श्रेयस मोरे, राहुल पाटील यांच्या गोलच्या जोरावर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने तुल्यबळ दिलबहार तालीम मंडळ ‘अ’चा ३-२ असा पराभव करीत अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.

शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी या दोन संघांत सामना झाला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला ‘दिलबहार’च्या खेळाडूने ‘प्रॅक्टिस’ची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ‘प्रॅक्टिस’चा गोलरक्षक अल्फाज हकीम याने अवैधरीत्या अडविल्याबद्दल पंचांनी दिलबहार संघास पेनल्टी बहाल केली. त्यावर इमॅन्युअल इचिबेरी याने मारलेला फटका थेट गोलरक्षकाच्या हातात गेल्याने गोल करण्याची दिलबहार संघाची सोपी संधी वाया गेली. ‘प्रॅक्टिस’कडून ३९ व्या मिनिटास डेव्हिड ओपेरा याने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ५४ व्या मिनिटास ‘प्रॅक्टिस’कडून श्रेयस मोरेने संघाचा दुसरा गोल नोंदविला. त्यानंतर ‘दिलबहार’कडून ५८ व्या मिनिटाला इचिबेरीने दिलेल्या पासवर राहुल तळेकरने गोल करीत संघाची आघाडी २-१ ने कमी केली. त्यानंतर ७९ व्या मिनिटास प्रॅक्टिसकडून डेव्हिड ओपेराच्या पासवर राहुल पाटीलने गोल करीत संघास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. याच गोलसंख्येवर प्रॅक्टिस विजयी होईल, असे वाटत असताना जादाच्या वेळेत दिलबहारच्या खेळाडूस प्रॅक्टिसच्या गोलक्षेत्रात अवैधरीत्या अडविले. त्यामुळे पंचांनी दिलबहारला पेनल्टी बहाल केली. त्यावर सचिन पाटीलने गोल करीत आघाडी ३-२ ने कमी केली.हुल्लडबाजी रोखासामन्यादरम्यान वरील प्रेक्षक गॅलरीत दोन गटांत हाणामारी झाली. त्यामुळे दोन वेळा प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत संबंधितांना ताब्यात घेतले. अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करावी, असे मत अनेक ज्येष्ठ फुटबॉलपटूंनी व्यक्त केले. सामन्यादरम्यान ‘प्रॅक्टिस’च्या डेव्हिड ओपेराने एक गोल करण्यासाठी संघातील खेळाडूला पास दिला. त्यावर आनंद व्यक्त करीत मैदानावर त्याने नृत्य केले. त्याचे हे नृत्य लक्षवेधी ठरले.

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर