शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day-रंकाळा येथे प्रेमीयुगुलांचे प्रबोधन, हिंदू युवा प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:53 IST

प्रेमाच्या नावाने अश्लील चाळे करणाऱ्या युवक-युवतींचे प्रबोधन करण्यासाठी हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे रंकाळा घाट येथे त्यांना गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आंदोलनामुळे प्रेमीयुगुलांची पळताभुई झाली.

ठळक मुद्देरंकाळा येथे प्रेमीयुगुलांचे प्रबोधनहिंदू युवा प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन

कोल्हापूर : प्रेमाच्या नावाने अश्लील चाळे करणाऱ्या युवक-युवतींचे प्रबोधन करण्यासाठी हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे रंकाळा घाट येथे त्यांना गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आंदोलनामुळे प्रेमीयुगुलांची पळताभुई झाली.हिंगणघाट येथील घटना असो किंवा मुलींवरचे होणारे अत्याचार पाहता मुला-मुलींमध्ये प्रबोधन करण्यासाठी हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे सोमवारी अनोखे आंदोलन केले.हलगीचा गजर करीत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ‘खऱ्या प्रेमाला आडोशाची गरज काय?’, ‘हिंगणघाटसारख्या घटनांमधून जाताहेत तरुणांचे बळी, सावध हो मुली, अशी येऊ नको कोल्हापूरवर पाळी’ असे फलक हातामध्ये घेऊन ते रंकाळा घाट येथे आले.

कॉलेज, क्लासेस चुकवून आलेल्या प्रेमीयुगुलांना गुलाबाचे फूल देऊन ‘तुमचे करिअर करण्याचे हे वय आहे, असा वेळ घालवू नका. आई-वडील कष्टाने तुम्हाला शिकवत आहेत, त्यांची जाणीव ठेवा.’ अशी शांततेने विनंती करून त्यांचे प्रबोधन केले.आंदोलनकर्त्यांना पाहून अनेक प्रेमीयुगुलांनी काढता पाय घेतला. आंदोलनात प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, संजय ढाले, श्रीकांत मनोळे, बाजीराव पाटील, राजू बुदले, मनीष कुलकर्णी, महेश इंगवले, राजू कदम, सचिन सुतार, रवींद्र घाटगे, प्रकाश घाटगे, सुशांत शिंदे, अनिल बोंद्रे यांचा सहभाग होता.

आमचा प्रेम करणाऱ्यास विरोध नाही. सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारत बसा, मात्र आडोशाला बसून अश्लील चाळे करण्यास आमचा विरोध आहे. आंदोलनाद्वारे मुला-मुलींमध्ये प्रबोधन करणे, हा आमचा उद्देश आहे.- अशोक देसाई, अध्यक्ष, हिंदू युवा प्रतिष्ठान.

 

 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेkolhapurकोल्हापूर