कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे करवीर विधानसभा मतदारसंघातून भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी पक्षाकडे आज, मंगळवारी मागणी अर्ज भरला. त्यांच्याबरोबर जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमधून, जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनी राधानगरी-भुदरगड, तर इचलकरंजीतून अशोकराव जांभळे, रवींद्र माने यांनी पक्षाकडे मागणी केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांतील इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. आतापर्यंत दहा मतदारसंघांतून ४७ अर्ज नेले आहेत. आज इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, आमदार के. पी. पाटील यांनी आपल्या मतदारसंघातून मागणी केली आहे. इचलकरंजीतून माजी आमदार अशोकराव जांभळे व इचलकरंजी नगरपरिषदेचे पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी करवीरमधून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. १६ आॅगस्टपर्यंत इच्छुकांकडून मागणी अर्ज स्वीकारले जाणार असून, १७ आॅगस्टला प्रदेश कार्यालयाकडे मागणी अर्ज पाठविले जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)यांनी नेले पक्षाचे फॉर्मचंदगड - आमदार संध्यादेवी कुपेकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह कुपेकर, मोहन कांबळेकरवीर- धैर्यशील पाटील-कौलवकर, जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे.शाहूवाडी- जिल्हा बॅँकेचे माजी संचालक मानसिंग गायकवाड, ‘दत्त’ आसुर्ले-पोर्लेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकरहातकणंगले- भास्कर शेट्टे, अशोकराव माने, आदी तिघांनीइचलकरंजी- अशोकराव जांभळे, रवींद्र माने, मदन कारंडे.शिरोळ- ‘शरद’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर,जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने. कोल्हापूर दक्षिण - प्रताप कोंडेकर, राजू माने व इतरकोल्हापूर उत्तर- शहराध्यक्ष आर. के. पोवार व महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे. कागल- जलसंपदामंत्री हसन मुश्रीफराधागरी- आमदार के. पी. पाटील.
‘करवीर’मधून धैर्यशील पाटील इच्छुक
By admin | Updated: August 13, 2014 00:35 IST