शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात विद्युत पुरवठाही खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 12:45 PM

Cyclone Rain Mecb Kolhapur : जोरदार वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरातील विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत होता. गेल्या दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. जोराच्या वाऱ्यामुळे झाडे पडून विद्युत तारा, खांड तुटण्याची शक्यता गृहीत धरून विद्युत पुरवठा खंडित केला जात होता.

ठळक मुद्देवाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात विद्युत पुरवठाही खंडितजोरदार वारे आणि पावसाचा फटका शहरातील वृक्षांना

कोल्हापूर : जोरदार वाऱ्यामुळे शहरातील विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत होता. गेल्या दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. जोराच्या वाऱ्यामुळे झाडे पडून विद्युत तारा, खांड तुटण्याची शक्यता गृहीत धरून विद्युत पुरवठा खंडित केला जात होता.

जोरदार वारे आणि पावसाचा फटका शहरातील वृक्षांना बसला. शहराच्या विविध भागात दहा वृक्ष कोसळले, तर अनेक ठिकाणी फांद्या तुटल्या. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन कोसळलेले वृक्ष रस्त्यातून बाजूला केले.महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊ घालेल्या चक्रीवादळामुळे शनिवारपासून शहरात जोरदार वारे वाहत आहेत.

रविवारीही दिवसभर जोरदार वारे वाहत होते. तसेच संततधार पाऊस कोसळत होता. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. अधूनमधून मोठी सर येत होती. रविवारी दिवसभरात सूर्यदर्शन झाले नाही. जोराच्या वाऱ्यामुळे शहरातील उद्यमनगर, ताराबाई पार्क, महाडिक पेट्रोल पंप, हॉकी स्टेडियमरोड, राजारामपुरी १० वी गल्ली, जरगनगर, शाहुपरी गुजराती हायस्कूल, सदरबाजार या परिसरातील वृक्ष कोसळले. तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत.सदरबाजार परिसरात जिल्हा परिषद क्वॉर्टर्स असून तेथील जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या घरावर नीलगिरीचे एक उंच झाड कोसळले. त्यामुळे घराचे किरकोळ नुकसान झाले. मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे जाऊन कोसळलेले झाड बाजूला केले. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे रेनट्री, गुलमोहराच्या झाडांची पाने, फुले, शेंगा रस्त्यावर पडून त्यामुळे रस्त्यावर दलदल झाली होती.कोल्हापूर शहर परिसरात वाऱ्याचा वेग तुलनेने थोडा कमी झाल्यानंतर दोन वाजता पावसाचा जोर चढला. हा जोर सायंकाळपर्यत टिकून होता. दोन दिवस जोराने वारे, संततधार पाऊस कोसळत असला तरी हवेतील उष्मा काही कमी झालेला नाही. पावसाबरोबरच उष्माही तेवढाच जाणवत होता. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळRainपाऊसmahavitaranमहावितरण