शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
2
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
3
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
4
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
5
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
6
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
8
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
9
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
10
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
11
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
12
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
13
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
14
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
15
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
16
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
17
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
18
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
19
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
20
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले

भाताच्या तुसांपासून वीजनिर्मिती

By admin | Updated: February 9, 2016 00:45 IST

माधव बापट यांचे संशोधन : घरातच थाटली प्रयोगशाळा

संतोष तोडकर  कोल्हापूरभाताच्या तुसांत सिलिकॉन असते. सिलिकॉन सेमी कंडक्टर असतो म्हणजे त्यापासून वीजनिर्मिती करता येऊ शकते. तुसांचा अर्क व त्यांची राख यामध्ये मिठाचे पाणी घालून तयार होणाऱ्या सिंगल सेलमधून एक ते ३० मिली अ‍ॅम्पियर वीजनिर्मिती होते. येथील रसायनशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या माधव बापट यांनी सन २००२ पासून यावर प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांच्या अथक परिश्रमांतून वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.पेशाने शिक्षक असलेले बापट निवृत्तीनंतर सातारा ते बेळगाव परिसरात अल्ट्रासॉनिक टेस्टिंगची कामे करायचे. मंदीमुळे त्यांना मिळणारी कामे कमी झाली. त्यामुळे कमी तांत्रिक गुंतागुंत, सुरक्षितता व कमी गुंतवणुकीत काही तरी करावे, असे त्यांना वाटत होते. भाताच्या तुसांत सिलिकॉन असल्याचे त्यांनी वाचले. रसायनशास्त्राचे पदवीधर असलेल्या बापट यांनी यासंबंधी संशोधन करण्याचे ठरविले. कपिलतीर्थ मार्केट परिसरातील राहत्या घरीच त्यांनी एका खोलीत प्रयोगशाळा थाटली. पहिल्यापासूनच काहीतरी वेगळे करून दाखवायची त्यांना आवड होती. काही काळ कोकणातील शाळेत सहायक शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीही पत्करली; पण शिक्षकीपेशात मन रमले नाही; त्यामुळे राजीनामा देऊन त्यांनी कोल्हापूरचा मार्ग धरला. ते सांगतात, ‘गेल्या तेरा वर्षांत असे हजारो प्रयोग केले आहेत. ही वीज सेलमध्ये साठवून ठेवू शकतो. हा सेल भिंतीवरील घड्याळात वापरता येतो. एकदा रेडिओमध्येही तो वापरून पाहिला. विजेचे दिवे, एलईडी बल्ब स्ट्रीप या सेलद्वारे वापरतो. त्यामुळे वीज बिलात बचत होते.’भाजीचे देठ गॅसवर उकळवून मिळणाऱ्या अर्कात विशिष्ट प्रमाणात मिठाचा वापर करूनही वीजनिर्मिती करता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. आजही वीज न पोहोचलेल्या दुर्गम भागात अशी घरच्या घरी वीजनिर्मिती करुन घर प्रकाशमान करण्याचे बापट यांचे स्वप्न आहे. यासाठी शाळांमध्ये जाऊन ते मुलांचे प्रबोधनही करतात. पेटंटसाठी प्रयत्नकमीत कमी खर्चात व सुरक्षित अशा वीजनिर्मितीच्या संशोधनाचे पेटंट मिळावे यासाठी सन २००९ पासून भाताच्या तुसांपासून वीजनिर्मिती, सिलिकॉन आॅक्साईडपासून वीजनिर्मिती, बोटॅनिकल वेस्टपासून वीजनिर्मिती असे तीन अर्ज त्यांनी मुंबईतील भारत सरकारच्या पेटंट कार्यालयात पाठविले आहेत; पण अजूनही सरकारने आपल्या संशोधनाची दखल घेतली नसल्याची खंत बापट यांनी व्यक्त केली.