शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआरआय’ नसल्याने पदव्युत्तर शिक्षण लटकले; शाहू मेडिकल कॉलेजमधील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:07 IST

राज्य शासनाकडे प्रस्ताव पडून

विश्वास पाटील कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमआरआय’ची सोय नसल्याने पदव्युत्तर शिक्षणास परवानगी मिळू शकत नाही. ‘एमआरआय’ची सोय करायची झाल्यास किमान १६ कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने शासनाकडे पाठवलेला प्रस्ताव पडून आहे. आरोग्यराज्यमंत्र्यांसह कोल्हापूरचे तीन वजनदार मंत्री सध्या राज्य मंत्रिमंडळात आहेत. त्यांनी मनावर घेतले तर हा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो.

तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्यामुळे कोल्हापूरला हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. त्याची सुरुवात २००१ मध्ये झाली. या महाविद्यालयात १८ विषय शिकविले जातात. पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेशक्षमता निश्चित होण्याची गरज असते. राज्य शासनाने त्यासाठी आवश्यकता प्रमाणपत्र द्यावे लागते. ते आता मिळाले आहे. आता पुढचा टप्पा म्हणून नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे संलग्नीकरण प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; परंतु पदव्युत्तर शिक्षणाची मंजुरी मिळायची झाल्यास ‘एमआरआय’ची सोय असणे ही त्याची पूर्वअट आहे. त्यासाठी १६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी मिळावा म्हणून शिर्डीचे साईबाबा संस्थान, मुंबईचा सिद्धिविनायक ट्रस्ट व राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. यांपैकी कुणाकडूनही निधी मिळून जोपर्यंत ही व्यवस्था होत नाही, तोपर्यंत पदव्युत्तर शिक्षणाची सोय होणार नाही. पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून दिली जाते.आता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) बाह्योपचारास येणाऱ्या आणि दाखल असलेल्या किमान २० टक्के रुग्णांना एमआरआय करावा लागतो. त्यासाठी खासगी रुग्णालयात किमान १० हजार रुपये मोजावे लागतात. तीच सोय ‘सीपीआर’मध्ये उपलब्ध झाल्यास १८०० रुपयांत एमआरआय होऊ शकतो. - डॉ. स्वेनील शहा, सहयोगी प्राध्यापक व प्रभारी विभागप्रमुख, क्ष-किरण विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर