शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी संघटनेतील वाद उफाळण्याची शक्यता

By admin | Updated: March 21, 2015 00:19 IST

आज बैठक : हॉकी बचाव अभियान समिती आक्रमक; लाईन बाजार येथे सायंकाळी आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हॉकी संघटनेने वरिष्ठ गटातील खुल्या स्पर्धा गेली चार वर्षे घेतलेल्या नाहीत. त्यामुळे वरिष्ठ गटातील खेळाडूंचे राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याने कोल्हापूरची हॉकीची परंपरा टिकविण्यासाठी लाईन बाजार येथे आज, शनिवारी हॉकी बचाव अभियान समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन केले आहे. वरिष्ठ गटातील स्पर्धा न झाल्याने खेळाडूंची राज्य, राष्ट्रीय पातळीवर निवड झाली नाही. परिणामी, गुणवत्ता असूनही खेळाडूंना स्पर्धांतून चमक दाखविता आली नाही. हॉकी वाचविण्यासाठी लाईन बाजार येथे पद्मापथक, छावा, पोलीस बॉईज, पोलीस संघातील आजी-माजी खेळाडूंनी एकत्रित प्रयत्न सुरू केले. लाईन बाजार येथील महापालिका मैदानावर या परिसरातील हॉकी खेळणारी तरुण मंडळे आहेत. मात्र, जिल्हा हॉकी संघटनेने वरिष्ठ गटातील एकही स्पर्धा गेल्या चार वर्षांत घेतली नसल्याने येथील तरुणांना स्पर्धा खेळण्यास वाव मिळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा लाईन बाजार येथील महापालिकेच्या मैदानात हॉकीचे वैभव पाहण्यास मिळावे व यासाठी जिल्हा संघटनेनेही येथील खेळाडू व संघटकांना सदस्यपदासाठी संधी द्यावी, अशी मागणी येथील खेळाडूंकडून होत आहे. याकरिता ही बैठक आयोजित केली आहे. यातून ध्यानचंद स्टेडियमवर स्पर्धा न होता, त्या लाईन बाजार येथेही व्हाव्यात, याकरिता प्राधान्य द्यावे. याचबरोबर हॉकी इंडियाने मान्यता दिलेल्या संघटनेत नवीन सदस्यांना संधी द्यावी, या मागण्यांचा ऊहापोह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका बाजूला लाईन बाजार येथील हॉकी मंडळे व एका बाजूला जिल्हा हॉकी संघटना असे चित्र दिसण्याची शक्यता आहे.