शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

भारतात हॉकी प्रशिक्षकांची स्थिती कळसूत्री बाहुल्यासारखी

By admin | Updated: July 26, 2015 23:54 IST

भारतात हॉकी प्रशिक्षकाला स्वातंत्र्य मिळत नसून अधिकाऱ्यांचा अधिक हस्तक्षेप असतो. दर्जेदार प्रशिक्षक हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा

पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रतिवर्षी वारकरी श्रद्धेने पंढरपूरला जातात. पंधरवड्याच्या एकादशीलाही विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणारा वारकरीही मोठ्या संख्येने आहे. त्याच श्रद्धेने दर रविवारी ‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या दर्शनासाठीही जाणारा मोठा भाविक आहे. देवाबद्दलची श्रद्धा मनात जरूर असायला हवी, त्याबद्दल कुणाचेच दुमत नाही, परंतु देवळातील देवाइतकेच माणसांतील देवपण शोधणारी माणसेही समाजात खूप आहेत. ती समाजाचे भले व्हावे यासाठी आपल्या कुवतीनुसार एक पाऊल पुढे होतात. त्यांनी केलेल्या मदतीतून जग बदलणार नाही परंतु कुणाचे तरी आयुष्य त्यातून घडत आहे, कुणाचे तरी अश्रू पुसले जात आहेत. या मदतीतून समाजातील चांगुलपणावरची श्रद्धा वृद्धिंगत होत आहे. त्यामुळेच या कामाचे मोल अधिक आहे. पांडुरंगाच्या भेटीइतकेच त्याचे महत्त्व... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अशा समाजकार्यातील पांडुरंगांचा शोध घेण्याचा ‘लोकमत’ने केलेला हा अनोखा प्रयत्न...!शिरोळमधील गरिबांचा ‘आरोग्यदूत’ --सुकुमारसकाप्पा‘आनंदवन’साठी मायेची ऊब--रवींद्र ओबेरॉयवृक्षसंवर्धन कार्यातील उदगावचा ‘शिवाजी’--शिवाजी गायकवाड तुम्हाला...‘सलाम’--दिनेश गुडेकरजेंद्रनगरात क्षीरसागर गॅस एजन्सीजवळ दिनेश नंदकुमार गुडेकर यांचे ‘महालक्ष्मी जनरल स्टोअर्स’ नावाचे छोटेसे दुकान आहे. दहावीनंतर आयटीआय केल्यावर त्यांना गोकुळ शिरगांवला मेनन बेअरिंग्जमध्ये नोकरी मिळाली. तिघे भाऊ आणि आईसह ते दुकानाच्या वरच अपार्टमेंटमध्ये राहतात. दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत’मध्ये दिवाळीच्या तोंडावर ‘यांचीही दिवाळी तुम्ही गोड करा...’ असा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये शिशु आधार केंद्राची माहिती दिली होती तेव्हापासून दिनेश दरमहा त्या संस्थेला न चुकता किमान दहा किलो साखर किंवा तांदूळ स्वत:हून नेऊन देत आहेत. दिलेली मदत त्या हातालाही ते माहीत होऊ देत नाहीत. त्याबद्दल विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिले ते समाजाने त्यांना सलाम करावा असेच आहे. ते म्हणतात, ‘आमची जडणघडण अतिशय गरिबीतून झाली. आईने आम्हाला कष्टातून लहानाचे मोठे केले. आम्ही खूप सोसले त्यामुळे एखाद्याने केलेल्या मदतीचे मोल काय असू शकते हे जाणतो. आम्हाला कुणीतरी मदत केली म्हणून आम्ही इथंपर्यंत आलो, त्याची जाण ठेवूनच मी ही छोटीशी मदत करत आहे.’ गरजू विद्यार्थ्यांचा आधार--रंगनाथ आद्यरच्या प्रतिकुल परिस्थितीला टक्कर देत दहावीत चांगली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या पालक म्हणून महाडिक वसाहतीमधील इंटेरिअर डेकोरेशन व्यावसायिक रंगनाथ आद्य कार्यरत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना त्यांचा मोठा आधार मिळत आहे. आपल्याला कुणीतरी मदत केल्याने चांगले शिक्षण घेता आले. आता आपण मदत केली पाहिजे, या भूमिकेतून रंगनाथ आद्य यांनी प्रेस्टिज कन्सल्टन्सी सर्व्हिस संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात केली. या संस्थेचे समन्वयक असलेले आद्य हे दहावीचा निकाल लागल्यानंतर वर्तमानपत्रांमधून येणाऱ्या प्रतिकुल परिस्थितीतून दहावीत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या यशकथांतून माहिती मिळवितात. शिवाय अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्षात पाहणी करतात. त्यातून शिक्षणासाठी पालकत्व घेण्याच्यादृष्टीने विद्यार्थ्यांची निवड करतात. सध्या तंत्रनिकेतन आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. ज्यांना आर्थिक मदत हवी आहे, त्यांना ती दिली जाते. मदत मिळाल्यानंतर त्याच्या खर्चाचे योग्य नियोजन ते करून देतात. डोंगराएवढा त्याग...-पी. डी. देशपांडेलाखाचा पगार असलेली बँकेतील नोकरी सोडून कुणी अपंग कल्याणाचे काम करतो असे म्हटले असते तर समाजाने त्यांना खुळ््यात काढले असते, परंतु असा एक माणूस कोल्हापुरात आहे. पी. डी. देशपांडे त्यांचे नाव. ते मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टीचे. युनायटेड वेस्टर्न बँकेत वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांना अधिकारी म्हणून नोकरी लागली. नोकरीच्या निमित्ताने कोल्हापूरला आले आणि या मातीचा कण बनून गेले. अपंग कल्याणाच्या क्षेत्रात देशात नावलौकिक मिळविलेल्या ‘हेल्पर्स आॅफ दि हँडीकॅप्ड’ संस्थेशी ते स्थापनेपासून जोडले गेले. संस्थेच्या कामाचा विस्तार सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाल्यावर नसीमा हुरजूक (दीदी) त्या संस्थेकडे पाहू लागल्या. त्यामुळे कोल्हापुरातील संस्थेकडे पूर्णवेळ लक्ष देणारे कोणीतरी हवे होते. एखाद्या बँकेला कुणीही माझ्यापेक्षा सरस अधिकारी मिळू शकेल, परंतु अपंग पुनर्वसनाचे काम करायला कोण मिळणार नाही. त्यामुळे हे काम हीच आपली खरी जबाबदारी आहे, असे मानून त्यांनी जानेवारी २००५ ला नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्या बँकेतील नोकरीची मुदत २०२० पर्यंत होती परंतु ते नोकरीतून बाहेर पडले. आता ते संस्थेचे संघटक, खजानिस व मुख्यत: शिक्षण विभागाची जबाबदारी पाहतात. या कामाबद्दल त्यांना संस्थेचा पगार नाही. ते त्यांनी स्वत:हून पत्करलेले काम आहे. आपण जे केले त्याबद्दल त्यांना कधीच एक क्षणही पश्चाताप झालेला नाही. आपली बदली कोल्हापूरला झाली म्हणूनच या कामाशी जोडलो गेलो. कदाचित नियतीनेच मला हे नेमून दिलेले काम असावे आणि ते मी उत्तमरितीने पार पाडावे, अशी त्यांची त्यामागील भावना आहे. बँकेतील लोक आपल्या सहकाऱ्याला कधी तरी घरी सोडायची वेळ आल्यास मी आज जरा गावी जाणार असल्याचे कारण सांगतात. तिथे एक अधिकारी नोकरीवर पाणी सोडून आयुष्यभर अपंगांच्या जगण्याची काठी बनतो हे केवढे धाडस...!