शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील आॅडीओ क्लिप प्रकरण : विहिंप,बजरंग दलाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 16:07 IST

कबनूर (ता.हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करून यामध्ये सहभागी असणाºया अन्य संशयितांना आरोपी करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यासह परिसरातील युवकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर शुक्रवारी मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देअश्लील आॅडीओ क्लिप प्रकरण : विहिंप,बजरंग दलाचा पोलिस ठाण्यावर मोर्चाअल्पवयीन तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शासन करा

इचलकरंजी : कबनूर (ता.हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करून यामध्ये सहभागी असणाऱ्या अन्य संशयितांना आरोपी करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यासह परिसरातील युवकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर शुक्रवारी मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांना देण्यात आले.कबनूर-दत्तनगर परिसरातील एका अल्पवयीन तरुणीची अश्लील आॅडिओ क्लिप प्रसारीत करून तिला मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांसह दोन मुख्य संशयित अशा सहाजणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित तरुणाने तिच्याशी फोनवरून अश्लील संभाषण करून ती ध्वनिफित सोशल मीडियावर प्रसारीत केली. अटक केलेल्या संशयित आरोपींनी यापूर्वीही अशी कृत्ये केलेली आहेत.

या प्रकरणात सुरूवातीला संबंधित तरुणाला कबनूर पोलिस चौकीत बोलावून घेवून वडिलांसमक्ष समज दिली होती. या प्रकाराबाबत त्यांच्या नातेवाइकांना माहिती होती. तरीही त्यांनी मुलांना रोखण्याऐवजी फूस लावल्याची तक्रारही आंदोलकांनी केली.या सर्व प्रकरणांचा गांभीर्याने तपास करून पोलिस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवकुमार व्यास, संतोष कोळी उर्फ बाळ महाराज, संतोष हत्तीकर, सोमेश्वर वाघमोडे, सुजित कांबळे, सर्जेराव कुंभार, आदींसह बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कबनूर (ता.हातकणंगले) येथील अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. (छाया-उत्तम पाटील)

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर