शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मुरगूडच्या महिला मल्लांकडून आठ पदकांची लयलूट

By admin | Updated: March 22, 2016 01:02 IST

पुणे महापौर चषक स्पर्धा : तब्बल अडीच लाखांची बक्षिसे पटकावली

मुरगूड : पुणे येथे झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सर्वच वजनी गटामध्ये मुरगूड (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलातील महिला मल्लांनी वर्चस्व मिळविले. विविध वजनी गटात सहभागी झालेल्या आठ महिला मल्लांनी तब्बल अडीच लाखांच्या बक्षिसांबरोबरच आठ पदकांची कमाई केली आहे. राज्यातील सर्वांत जास्त पदके, बक्षिसे मिळविणारे एकमेव मुरगूडचे कुस्ती केंद्र कौतुकास पात्र ठरले आहे.५३ किलो वजनी गटात सलग तिसऱ्यावर्षी स्वाती संजय शिंदेने सुवर्णपदक पटकावले. तिला रोख ४० हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. तिने पहिल्या फेरीमध्ये ठाणेच्या कोमल देसाईला भरंदाज डावावर १०-० अशा फरकाने पराभूत केले. कोल्हापूरच्या राधा पाटीलला उपांत्य सामन्यात, तर अंतिम फेरीत जळगावच्या रुपाली महाजनला मोळी डावावर चितपट करत स्वातीने सुवर्ण पदक पटकाविले. ५५ किलो वजनी गटात नंदिनी बाजीराव साळोखेनेही सलग तिसऱ्यावर्षी सुवर्णपदक पटकावले. पहिल्या फेरीत पुण्याच्या तृप्ती तांगडेला कलाजंग डावावर १० गुण फरकाने, तर दुसऱ्या फेरीत ठाणेच्या मोनाली साळुंखेला दुहेरी पट काढून चितपट केले. अंतिम फेरीत मुरगूडच्या अंकिता शिंदेला नंदिनीने मोळी डावावर चितपट केले. तिला सन्मानचिन्ह व ४० हजार रुपये देऊन गौरविले. ५५ किलो गटात अंकिता आनंदा शिंदे हिला रौप्यपदक व ३० हजार रुपये, ६९ किलो गटात वैष्णवी रामा कुशाप्पालाही रौप्यपदक आणि ४० हजार रुपये. ४८ किलो गटात अनुष्का भारत भाटला कांस्यपदक व २० हजार रुपये. ५८ किलो वजनी गटामध्ये तेजश्री मारुती मेंडकेला कांस्यपदक व २० हजार रुपये. ६० किलो वजनी गटात सृष्टी जयवंत भोसले हिला कांस्यपदक व २० हजार रुपये रोख, तर ६३ किलो वजनी गटात प्रियांका सुखदेव येरूडकर हिला कांस्यपदक आणि २५ हजार रुपये देऊन सन्मानित केले.या आखाड्याला दोन सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदके मिळाली. या सर्व मल्लांना कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक दादासो लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.