शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पायऱ्या झिजवून नवरा मेला, माझा जीव हाय तोवर न्याय द्या

By भारत चव्हाण | Updated: September 7, 2023 14:13 IST

कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोर एका महिलेने मांडली व्यथा

कोल्हापूर : ‘महानगरपालिका नगररचना विभागाच्या पायऱ्या झिजवून-झिजवून माझा नवरा मेला; पंधरा वर्षे सातत्याने तक्रारी करून दमलेय. आता माझा जीव हाय तोवर तर मला न्याय द्यावा,’ अशी विनवणी मंगळवार पेठेतील डाकवे गल्ली येथील मालती शिंदे यांनी केली. शिंदे या आपल्या चार मुलींना घेऊन बुधवारी नगररचना कार्यालयात प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना भेटायला गेल्या होत्या. त्यांच्यासमोर त्यांनी सारी व्यथा मांडली आणि नंतर त्या पत्रकारांशीही बोलल्या.बुधवारी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत प्रशासक तक्रारी ऐकणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ३५ हून अधिक नागरिकांनी नगररचना कार्यालयात जाऊन प्रशासकांसमोर व्यथा मांडल्या. या सर्व तक्रारींचे पुढील एक महिन्यात निवारण करा, अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मालती शिंदे या मंगळवार पेठेतील डाकवे गल्ली येथे राहतात. त्यांच्या १८ बाय ५४ फुटांच्या जागेवर शेजारील व्यक्तीने अतिक्रमण केलेय असा त्यांचा दावा आहे. त्यांचे पती या अतिक्रमणाबाबत नगररचना विभागाकडे तक्रारी करीत होते. ‘आज बघू, उद्या बघूया,’ असे अधिकारी सागंत होते. नंतर ते मोजणी नकाशा आणा असे सांगत राहिले. बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांची भेट व्हायची नाही. कधी-कधी नुसती पाहणी करून जायचे. कारवाई काहीच होत नव्हती. शेवटी न्यायालयाकडून मोजणी मागून घेतली. ही मोजणी शिंदे यांच्या बाजूनेच होती. तिची अंमलबजावणी करा म्हणून आग्रह धरला तर त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. हा सगळा पाठपुरावा करत असताना शिंदे यांच्या पतींचे निधन झाले. बुधवारी मालती या चार मुलींना घेऊन प्रशासक मंजूलक्ष्मी यांना भेटायला गेल्या होत्या. त्यांच्यासमोर त्यांनी सारी हकीकत मांडली.

माजी सैनिकही मारताहेत फेऱ्यासन १९६५ च्या युद्धात लढलेले माजी सैनिक दिनकर वाडकरही नगररचना कार्यालयातील कार्यपद्धतीला कंटाळले आहेत. त्यांच्या शेजारी एकाने घर बांधले असून मूळ नकाशात दरवाजा नसतानाही त्याने तेथे दरवाजा केला आहे. त्याचा आपल्याला त्रास होत असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यांनी तो दरवाजा बंद करण्याची कारवाई करावी, अशी मागणी प्रशासकांकडे केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर