शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

प्रदूषणप्रश्नी दिल्लीपर्यंत धडक

By admin | Updated: December 19, 2014 00:12 IST

एक वर्षे अभ्यास, सर्व्हे करून प्रदूषण रोखण्यासाठी निधीसाठी केंद्रापर्यंत मजल मारणारी राज्यातील ही पहिली जिल्हा परिषद

मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतर्फे सरत्या वर्षात अतिशय संवेदनशील अशा पंचगंगा प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी तब्बल १०८ कोटी ९३ लाखांचा प्रकल्प केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यात प्रशासनाला यश आले. एक वर्षे अभ्यास, सर्व्हे करून प्रदूषण रोखण्यासाठी निधीसाठी केंद्रापर्यंत मजल मारणारी राज्यातील या वर्षातील ही पहिली जिल्हा परिषद असावी.नदीकाठावरील ३८ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळते. तज्ज्ञ कमिटीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषद प्रशासनाने १० जानेवारी २०१३ ला सर्वेक्षणाचे काम सुरू केले. उपाय योजनेचा प्रकल्प अहवाल वर्षात तयार करून पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे दिले. दुरुस्ती करून तेथून १०८ कोटी ९३ लाखांचा प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडून निधीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला आहे. आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘कायापालट’ उपक्रमातून लोकसहभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा चेहरामोहरा बदलला; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत वर्षापासून अनेक आरोग्य केंद्र राहिली. संपूर्ण वर्षात सर्व आरोग्य केंद्रात डॉक्टर देण्यात जिल्हा परिषदेला अपयश आले. जिल्हा परिषदेने प्लास्टिक मुक्ती अभियान प्रभावीपणे राबविले. कापडी पिशव्या वापरण्याची सवय कर्मचाऱ्यांना लागली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सकारात्मक पाऊल टाकले. गुणवत्ता वाढावी यासाठी एक दिवस शाळा भेट कार्यक्रम राबविला. कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह राहावा, यासाठी नवचैतन्य शिबिर घेण्यात आले. शिंगणापुरातील निवासी क्रीडा प्रशालेला ऊर्जितावस्था आणली. अपंग विद्यार्थ्यांसाठी डे केअर सेंटर सुरू केले. शिक्षक संघटनेने न्यायालयात जाऊन समायोजनच्या प्रक्रियेला स्थगिती मिळवत आडकाठी आणली होती; मात्र जिद्दीने प्रशासनाने न्यायालयात भक्कम बाजू मांडत स्थगिती उठवून त्या संघटनेला चांगली चपराक दिली. शिक्षक संघटनेच्या दबावाला बळी न पडता शासनाच्या जीआरनुसार मुख्यालयात राहण्याच्या सक्तीचा आदेश काढण्याचे ‘धाडस’ केले. प्रशासनाला शिस्त आणण्यासाठी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी लेटकमर्सना चांगलाच दणका दिला. सदस्यांना संधीयंदा सदस्य अमल महाडिक यांना आमदार होण्याचे भाग्य मिळाले. नऊवारी साडीतील विमल पाटील अध्यक्षपदी विराजमान झाल्या. लोकसभा निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे संजय मंडलिक यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उमेश आपटे यांना अध्यक्षपद मिळाले.भीमगोंडा देसाई