शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण हेच संघर्षाचे मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:50 IST

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा यादोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेचपाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्यासाठी वारणा बचाव कृती समितीने केलेला विरोध आणि सध्या तरी शहरास पिण्याच्या पाण्यासाठी वारणा नदीशिवाय अन्य स्रोत नसणे अशा ...

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा यादोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेचपाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्यासाठी वारणा बचाव कृती समितीने केलेला विरोध आणि सध्या तरी शहरास पिण्याच्या पाण्यासाठी वारणा नदीशिवाय अन्य स्रोत नसणे अशा काही विचित्र अवस्थेत ही नळ योजना सापडली आहे.इचलकरंजीसाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला सरकारने मंजुरी देऊन दीड वर्ष आणि निविदा मंजूर करीत काम सुरू करण्याचे आदेश देऊन तेरा महिने उलटले आहेत. मात्र, प्रत्यक्ष योजना राबविण्यासाठी काहीही प्रगतीझाली नाही. आता वारणा बचावकृती समितीच्या आंदोलनाला इचलकरंजीत प्रतिआंदोलन उभे राहिल्याने संघर्ष अटळ ठरत आहे.स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात इचलकरंजीत संस्थानकालीन पाणीपुरवठा होता. त्यावेळी आॅईल इंजिन व पंपाद्वारे पंचगंगेतील विनाप्रक्रिया केलेले पाणी शहरास पुरविले जात होते. विविध ठिकाणी असलेले हौद व मोठे तळे येथे सोडण्यात आलेले पाणी नागरिक घागरी भरून घेऊन घरी नेत आणि त्याचा वापर करीत.सन १९६० नंतर मात्र कापडाला मागणी वाढल्यामुळे साहजिकच यंत्रमाग उद्योगात वाढ झाली. त्यामुळे लोकसंख्येतही लक्षणीय वृद्धी झाली. साधारणत: एक लाख लोकसंख्येच्या वस्त्रनगरीसाठी तत्कालीन नगरपालिकेने पाणीपुरवठा योजना राबवली. त्यावेळी सुद्धा स्वतंत्र जलशुद्धिकरण केंद्र नसले तरी ब्लिचिंग पावडरचा डोस देऊन सार्वजनिक नळाद्वारे नागरिकांना पाणी पुरविले जात होते.पंचगंगा नदीवर दहा दशलक्ष लिटर क्षमतेची नळ योजना कार्यान्वित होऊन ५० वर्षे उलटली. तिची क्षमता कमी झाल्यामुळे जेमतेम आठ दशलक्ष लिटर इतके पाणी मिळते आहे, तर पंचगंगा दूषित झाल्यामुळे सन २००० मध्ये कृष्णा नदीवरून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. ४५ दशलक्ष लिटर दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली या योजनेची दाबनलिका गळतीमुळे ग्रासली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असून, या योजनेमार्फत दररोज ३० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळत आहे.शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत दररोज ५४ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असूनसुद्धा पंचगंगा व कृष्णाया दोन्ही योजनांतून केवळ ३८ दशलक्ष लिटर इतकेच पाणी उपलब्ध होते. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाल्याने नेहमीच दोन दिवसांतून एकवेळ पाणी दिले जाते.कोल्हापूर, इचलकरंजीचा प्रदूषणात वाटाउन्हाळ्यामध्ये पंचगंगेच्या पाण्याच्या प्रदूषणामध्ये वाढ होते. त्यामुळे पंचगंगेचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो.कृष्णेच्या पाण्यावरच शहरवासीयांनापाणी दिले जाते. त्यामुळे तीन ते चार दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो.उन्हाळ्यात पंचगंगा दूषित झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. पंचगंगा अक्षरश: गटारगंगा होते.आता पंचगंगेपाठोपाठ कृष्णा नदीतील पाणीसुद्धा दूषित होऊ लागले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता शहरवासीयांसाठी वारणा नदीतून पाणी आणणारी योजना शासनाकडून राबवली जाणार आहे.