शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Ganesh Mahotsav - सोनाळीत प्रदूषणमुक्त गणेशोत्सव, रंगविरहित शाडूच्या गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:50 IST

अतिवृष्टी व महापुराच्या विळख्यात सापडलेल्या करवीर तालुक्यातील सोनाळी हे १७०० लोकसंख्येचे छोटेसे गाव . गेली ७१ वर्षे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव येथे साजरा केला जातो . डॉल्बीमुक्ती व निर्माल्याची सुव्यवस्थेत विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील तरुण मंडळानी चालू ठेवली आहे .

ठळक मुद्देसोनाळीत प्रदूषणमुक्त गणेशोत्सव, रंगविरहित शाडूच्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची एकाहत्तर वर्षांची अखंडित परंपरा

निवास वरपे

म्हालसवडे/कोल्हापूर  : अतिवृष्टी व महापुराच्या विळख्यात सापडलेल्या करवीर तालुक्यातील सोनाळी हे १७०० लोकसंख्येचे छोटेसे गाव . गेली ७१ वर्षे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव येथे साजरा केला जातो . डॉल्बीमुक्ती व निर्माल्याची सुव्यवस्थेत विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील तरुण मंडळानी चालू ठेवली आहे .धाकेश्वर हे या गावाचे ग्रामदैवत आहे . हिंदू धर्मातील सर्व सण वर्षभर पारंपरिक प्रथेप्रमाणे येथे साजरे केले जातात . या गावात अजूनही बलुतेदारी पद्धत सुरू आहे . कुंभार समाजाकडून लागणारे सर्व साहित्य म्हालसवडे येथील कुंभार बांधव या ग्रामस्थांना वर्षभर पुरवतात .येथील ग्रामदेवतांना गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या रंगीत मूर्ती चालत नाहीत अशी अख्यायिका आहे . या धार्मिक भीतीपोटी ग्रामस्थ आपल्या घरी गणरायाच्या रंगीत अथवा प्लास्टरच्या मूर्ती बसवतच नाहीत.पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त असा येथील गणेशोत्सव संपूर्ण राज्यभर माहित झालेला आहे . येथील ग्रामस्थ अबालवृद्ध मंडळी गौरी गणपतीच्या सनावर विशेष लक्ष ठेवून असतात . जय शिवराय व धाकेश्वर तरुण मंडळांच्या माध्यमातून प्रवचन कीर्तन भजन व्याख्याने महाप्रसाद व प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात.

या मध्ये महिलां व मुलीही सक्रीय सहभागी असतात. येथे गणेश आगमनाच्या वेळी व विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही डॉल्बीमुक्त सण साजरा करण्यासाठी टाळ मृदुंग हलगी लेझीम व झांज पथकांचा वापर केला जातो.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर