शहरं
Join us  
Trending Stories
1
३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
2
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
3
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
4
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
5
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
6
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
7
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
8
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
9
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
10
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
11
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
12
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
13
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
14
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
15
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
16
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
17
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
18
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
19
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
Daily Top 2Weekly Top 5

स्थगितीचे सावट दूर, इच्छुकांचा जीव भांड्यात; जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकारणास वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:23 IST

निवडणुकांचा बिगुल १५ डिसेंबरनंतर?

कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळातच म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीवरील टांगती तलवार बाजूला झाली असून, इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे. आरक्षण मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेल्याने इच्छुकांची घालमेल सुरू होती. मात्र, आता प्रचाराला पु्न्हा वेग येणार आहे.राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आचारसंहितेची मर्यादा ओलांडली होती. पन्नास टक्केपेक्षा अधिक जागा आरक्षित झाल्या होत्या, त्यावर काहींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार असली, तरी निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आरक्षणाचे उल्लंघन झाले नसल्याने येथे निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे आरक्षण निश्चित झाल्यापासून इच्छुकांनी मतदारसंघात जोर-बैठका मारण्यास सुरुवात केली आहे. अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात इच्छुकांनी घरोघरी गाठीभेटी सुरू केल्या होत्या. पण, आरक्षणाचा मुद्दा पुन्हा न्यायालयात गेल्याने त्यांची घालमेल सुरू होती. मात्र, आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

निवडणुकांचा बिगुल १५ डिसेंबरनंतर?न्यायालयाने निवडणुकीचा मार्ग मोकळा करून दिला असला, तरी हिवाळी अधिवेशन घ्यावे लागणार आहे. नगरपालिकांचा निकाल ३ डिसेंबरला आहे. त्यानंतर ८ डिसेंबरपासून आठवडाभराचे अधिवेशन घेतले जाऊ शकते. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका साधारण १५ डिसेंबरनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Local Elections to Proceed: Relief for Candidates, Politics Intensifies

Web Summary : Maharashtra local body elections are confirmed by January 31st, calming anxious candidates. Court cleared path despite reservation concerns, as Kolhapur faces no such issues. Preparations restart with increased political activity expected post-December 15th announcement.