शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...तर राजकारणातही खिलाडूवृत्ती येईल - अरुण नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:03 IST

खेळामुळे खिलाडूवृत्ती येते. हार-जित पचविण्याची ऊर्जा तयार होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनाही एखादा खेळाडू असल्याची अट घालावी.

ठळक मुद्दे: कोल्हापूर क्रिकेट असो.तर्फे सत्कार

कोल्हापूर : खेळामुळे खिलाडूवृत्ती येते. हार-जित पचविण्याची ऊर्जा तयार होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनाही एखादा खेळाडू असल्याची अट घालावी. त्यामुळे खेळाडू राजकारणी झाल्याने राजकारणातही खिलाडूवृत्ती येईल, असे प्रतिपादन ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केले.

कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनतर्फे गुरुवारी सायंकाळी १६ वर्षांखालील जिल्हा संघातील खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर होते.स्पर्धेत १९ वर्षांखालील जिल्हा क्रिकेट महिला संघाने ताराराणी चषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळविल्याबद्दल महिला खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू रघुनाथ पिसे यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नरके यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सचिव केदार गयावळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नरके यांच्या मानपत्राचे वाचन निसार मुजावर यांनी केले. अजित मुळीक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, उपाध्यक्ष चेतन चौगुले, रवींद्र उबेरॉय, बापूसाहेब मिठारी, रमेश हजारे, जनार्दन यादव, मधुकर बामणे, विश्वजित महागांवकर, रोहन भुईवर यांच्यासह खेळाडू, पालक, असोसिएशनचे सभासद उपस्थित होते.महाडिक यांना मीच ‘गोकुळ’मध्ये आणलेआनंदराव पाटील-चुयेकर यांनी मला ‘गोकुळ’मध्ये आणले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोकुळ’ कार्यालयात आणून आम्ही त्यांचा सत्कार करीत होतो. तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे यांनाही मी शोधले. एवढेच काय, महादेवराव महाडिक यांनाही मीच ‘गोकुळ’मध्ये आणले. नंतर त्यांनी ‘गोकुळ’ ताब्यातच घेतले. आता ते माझे नेते आहेत. महादेवराव महाडिकदेखील चांगले कुस्तीपटू आहेत, असे प्रतिपादन नरके यांनी केले.कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनतर्फे गुरुवारी १६ वर्षांखालील जिल्हा संघातील खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांच्या सत्कार समारंभप्रसंगी अरुण नरके, बाळ पाटणकर, रघुनाथ पिसे, रवींद्र उबेरॉय, ऋतुराज इंगळे, चेतन चौगुले, आदी मान्यवर उपस्थित होते.