शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाटाकडील तालमीकडे नेताजीचषक

By admin | Updated: April 13, 2017 00:46 IST

फुलेवाडी संघावर ३-० ने मात; हृषिकेश मेथे-पाटीलचे दोन गोल

कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर ३-० अशी मात करत नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अखेरच्या सामन्यात पाटाकडीलच्या हृषिकेश मेथे-पाटीलने दोन गोल नोंदविले. शाहू स्टेडियम येथे बुधवारी पाटाकडील ‘अ’ व फुलेवाडी या संघात अंतिम सामना झाला. सामन्याच्या प्रारंभी ‘फुलेवाडी’कडून रोहित मंडलिक, तेजस जाधव, जयसन वाझ, सिद्धेश यादव, सूरज शिंगटे यांनी जोरदार चढाई करत पाटाकडील ‘अ’ च्या गोलक्षेत्रात दबाव निर्माण केला. रोहित मंडलिक, तेजस जाधव यांच्या दोन संधी तर हमखास गोल अशा होत्या. मात्र, फु लेवाडी संघाकडून आज नशीब नसल्याने अगदी गोलपोस्टमधून अक्षरश: या दोन संधी निघून गेल्या. ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथे-पाटील, ओंकार जाधव, ओंकार मोरे, असिफउल्ला खान, रणजित विचारे, रूपेश सुर्वे यांनी तितक्याच वेगवान चाली करत गोल करण्याचे प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. दोन्ही संघांकडून पूर्वार्धात गोल करून आघाडी घेण्याच्या अनेक संधी वाया गेल्या. उत्तरार्धात ४३ व्या मिनिटास पाटाकडील‘अ’ ला मिळालेल्या कॉर्नर किकवर हृषिकेश मेथे-पाटील याने हेडद्वारे अचूक गोल नोंदवत सामन्यात १-० अशी आघाडी निर्माण केली. या गोलनंतर ‘फुलेवाडी’कडून अनेक चढाया केल्या. मात्र, पाटाकडीलच्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथे-पाटीलने मारलेल्या फटका फुलेवाडी गोलरक्षक निखिल खाडे याने चपळाईने बाहेर काढला. ८० व्या मिनिटास फुलेवाडी संघ आॅफसाईड पकडण्याच्या प्रयत्न करत असताना ‘पाटाकडील’कडून प्रवीण जाधवने गोलरक्षकाला चकवत गोल नोंदवला. त्यामुळे सामन्यांत २-० अशी आघाडी निर्माण झाली. शेवटच्या जादा वेळेत हृषिकेश मेथे-पाटीलने मैदानी गोलची नोंद करत सामन्यात ३-० अशी आघाडी निर्माण केली. अखेरपर्यंत हीच गोलसंख्या कायम ठेवत पाटाकडील‘अ’ने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेच्या मध्यंतरात आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या पाटाकडील ‘अ’ संघास विजेतेपदाचा चषकासह रोख पन्नास हजार व उपविजेत्या फुलेवाडी संघास २५ हजार रोख व चषक श्री शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, के.एस.ए. पदाधिकारी माणिक मंडलिक, माजी नगरसेवक बबन कोराणे, रविकिरण इंगवले, उद्योजक चंद्रकांत यादव, सुजित चव्हाण, राजू साळोखे, राजू राऊत, अजित चव्हाण, विजय साळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. उत्कृष्ट खेळाडू फॉरवर्ड- हृषिकेश मेथे-पाटील, गोलरक्षक - उत्कर्ष देशमुख, हाफ- ओंकार पाटील (तिघेही पाटाकडील ‘अ ’), डिफेन्स- सिद्धेश यादव, मालिकावीर - तेजस जाधव (दोघेही फुलेवाडी संघ).नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघास विजेतेपदाचा चषक श्री शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, बबन कोराणे, अजित चव्हाण, रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, राजू साळोखे, माणिक मंडलिक आदी उपस्थित होते.